शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

उपसभापतीपदाच्या निवडणुकीस नवे वळण?, भाजपाचा पाठिंबा बीजेडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 5:28 AM

राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीने नवे राजकीय वळण घेतले आहे. काँग्रेसने तृणमूलचे नेते सुखेंदु शेखर रॉय यांना आॅफर दिली आहे, तर भाजपाने बिजू जनता दलाच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे.

हरीश गुप्तानवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीने नवे राजकीय वळण घेतले आहे. काँग्रेसने तृणमूलचे नेते सुखेंदु शेखर रॉय यांना आॅफर दिली आहे, तर भाजपाने बिजू जनता दलाच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे.ही निवडणूक टाळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपाने २४१ सदस्य असलेल्या सभागृहात बिजू जनता दलाला आॅफर दिली आहे. शरद यादव अपात्र ठरल्यामुळे एक जागा रिक्त आहे. राष्ट्रपतींनी तीन रिक्त जागी सदस्य नेमतेले नाहीत. नियुक्त सदस्यांसह भाजपा ११२ पर्यंत पोहचू शकतो. पण शिवसेनेच्या ३ व विभाजित अद्रमुकच्या १३ सदस्यांबाबत भाजपाला खात्री नाही. मुख्यमंत्री नवीन पटनायक हे तेलुगु देसमचे ६ व तटस्थ पक्षांचे सदस्य एकत्र करण्यात यशस्वी होतील, असे भाजपाला वाटत आहे..काँग्रेसला वाटते की, तृणमूल आपला उमेदवार रिंगणात उतरवेल. सभागृहात यूपीएचे ९२ सदस्य असून, तृणमूल सहभागी झाल्यास संख्या १०५ वर जाईल. आपचे ३, आयएनएलडीचा १ व १ अपक्ष सदस्य सोबत आले तर ही संख्या ११० होते. टीडीपी, टीआरएस व वायएसआर काँग्रेस हे विरोधकांसोबत जातील असा अंदाज आहे. अहमद पटेल यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी याबाबत चर्चा केल्याचे कळते. सुखेंदु शेखर रॉय यांच्या उमेदवारीला बॅनर्जी तयार झाल्यास राजकीय लढाईला वेगळे वळण मिळेल. मात्र सुखेंदु रॉय यांचे नाव निश्चित झाल्याच्या वृत्ताला तृणमूलने नकार दिला आहे. डावे पक्षही तृणमूलच्या उमेदवारास विरोध करत आहेत.सन १९९२ च्या घडामोडींकडे पाहिल्यास, तेव्हा नजमा हेपतुल्ला काँग्रेसतर्फे उपसभापतीपदाची निवडणूक लढवत होत्या. विरोधकांच्या उमेदवार रेणुका चौधरी तेव्हा पराभूत झाल्या होत्या. आता नजमा हेपतुल्ला भाजपमध्ये आहेत, तर रेणुका चौधरी यांनीही पक्षांतर केले.निरोप समारंभ महत्त्वाचाउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे उपसभापती पी. के. कुरियन यांच्यासाठी निरोप समारंभ आयोजित करणार असून, तेव्हा कदाचित राजकीय चित्र अधिक स्पष्ट होईल.