नवी दिल्ली - दिल्लीतील विधानसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने येथील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या आप आणि भाजपामध्ये शह-काटशहाचा खेळ रंगू लागला आहे. दरम्यान, आपचे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांनी भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांबाबत मोठा दावा केला आहे. ''भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदाचे तीन उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही आमच्या संपर्कात आहेत. यापैकी एकाला जरी भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले तर उर्वरित दोघेजण आम्हाला मदत करतील. त्यामुळे विजेंद्र गुप्ता, विजय गोयल आणि मनीष तिवारी यांच्यापैकी मुख्यमंत्री बनण्याची कुणाची इच्छा आहे हे भाजपाने आधीच ठरवून घ्यावे,'' असा टोला संजय सिंह यांनी लगावला आहे.