शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

विजयासाठी भाजपाचा त्रिसूत्री फॉर्म्युला, विरोधकांची हवा काढणार; पेज प्रमुख, शक्ती केंद्र व कार्पेट बॉम्बिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 1:53 AM

गुजरात विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने जोरदार रणनीती आखली आहे. पक्षाने पेजप्रमुख, शक्ती केंद्र व कार्पेट बाँम्बिग अशी त्रिसूत्री त्यासाठी तयार केली आहे.

- नंदकिशोर पुरोहितअहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने जोरदार रणनीती आखली आहे. पक्षाने पेजप्रमुख, शक्ती केंद्र व कार्पेट बाँम्बिग अशी त्रिसूत्री त्यासाठी तयार केली आहे.गांधीनगरच्या सीमेवर असलेल्या ‘कमलम’ या प्रदेश मुख्यालयातून त्यावर लक्ष ठेवले जात आहे. आम्ही तयार केलेली ही रणनीती आम्हाला विजय मिळवून देईल. काँग्रेस व अन्य विरोधी पक्ष आमच्या विजयात अडथळा आणू शकत नाहीत, असे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे.विधानसभेच्या प्रत्येक जागेसाठी मतदानासाठी केंद्रावर येणाºया मतदारांच्या यादीचे पान पक्षाने पदाधिकारी व संबंधित कार्यकर्त्याला दिले आहे. एका बूथवर येणाºया ८00 ते ९00 मतदारांची जबाबदारी या पदाधिकारी व कार्यकर्त्यावर असेल. हे कार्यकर्तेच मतदारांना केंद्रांपर्यंत पोहोचवतील.पेज प्रमुखांचे चार ते पाच बूथ मिळून शक्ती केंद्र असेल. पेजप्रमुख नीट काम करत असल्याचे पाहण्याचे काम शक्ती केंद्र करेल. या पद्धतीने प्रत्येक मतदारसंघातील १00 ूबूथद्वारे आपला विजय निश्चित करण्याचे काम याप्रकारे केले जाईल.गुजरात गौरव संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पेजप्रमुखांना या कामाचे महत्त्व पटवून दिले होते. त्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पेजप्रमुखांची बैठक घेऊ न त्यांना या कामाचे गांभीर्य सांगितले. दिवाळीत या गौरव संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय प्रत्यके मतदारसंघातील ५00हून अधिक प्रमुख नागरिकांची बैठक घेऊ न, त्यांच्याकडे पाठिंबा मागितला.प्रदेश भाजपचे प्रवक्ते डॉ. जगदीश भावसार म्हणाले की, काँग्रेसने नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणून ज्यागप्रकारे हिणवले, त्याचे उत्तर आम्ही ‘मन की बात, चाय के साथ’ मधून रविवारी दिले आहे. उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे समर्थक ज्याप्रकारे गर्दी करीत आहेत, ते पाहता २२ वर्षांनंतरही गुजरातची जनता आम्हालाच विजयी करेल, हे स्पष्ट झाले आहे.क्या है कार्पेट बॉम्बिंगप्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नरेंद्र मोदी यांच्या सभा होणार आहेत. त्यांच्या सभा आज, सोमवारपासून सुरू झाल्या असून, ते २९ नोव्हेंबर रोजी ४ सभांत भाषणे करणार आहेत. पक्षाने मोदी यांच्या सभांना ‘कार्पेट बॉम्बिंग’ नाव दिले असून, त्याद्वारे विरोधी पक्ष व त्यांचा प्रचार संपवून टाकला जाईल.

टॅग्स :BJPभाजपाGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017