शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

पश्चिम बंगालमध्ये महुआ मोइत्रा यांच्या विरोधात भाजपचा 'हुकुमी एक्का', राजघराण्यातील राजमाता TMC ला टक्कर देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 1:49 PM

अमृता रॉय यांच्या उमेदवारीमुळे भाजपला मोठे बळ मिळेल. त्या महुआ मोईत्रा यांनाही टक्कर देऊ शकतात, असे निवडणूक तज्ज्ञांचे मत आहे...

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पारर्श्वभूमीरव सर्वच पक्ष आपल्या उमेदवरांची नावे जाहीर करताना दिसत आहेत. यातच रविवारी भारतीय जनता पक्षानेही आपल्या 111 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यात भाजपने पश्चिम बंगालमधील कृष्णानगर जागेसाठी राजमाता अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. त्या येथे टीएमसी नेत्या महुआ मोइत्रा यांना टक्कर देतील. भाजपच्या या निर्णयाकडे महुआ मोइत्रा यांच्या विरोधातील ट्रम्प कार्ड म्हणून बघितले जात आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगालमधील काही अत्यंत महत्वाच्या मतदारसंघांपैकी एक मानला जातो. 

या लोकसभा निवडणुकीत महाराजा कृष्णचंद्र यांचे नाव आत थेट राजकारणाशी जोडले गेले आहे. अमृता रॉय या कृष्णानगरच्या प्रतिष्ठित राजबाडी (रॉयल पॅलेस) च्या राजमाता आहेत. त्यांच्या संभाव्य उमेदवाहीसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून कयास लावले जात होते. माध्यमांतील वृत्तांनुसार, जिल्हा नेतृत्वाने अमृता यांना उमेदवार बनविण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली. यानंतर पक्षाने त्यांच्यासोबत बोलणी करायला सुरुवात केली. बऱ्याच वेळा बोलणी झाल्यानंतर, अमृता उमेदवार होण्यास तयार झाल्या.

भाजपला होणार फायदा? -अमृता ​​रॉय यांनी 20 मार्च रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कृष्णानगरमधून अमृता रॉय लोकसभेच्या मैदानात आहेत. नादिया जिल्ह्याच्या इतिहासात राजा कृष्णचंद्र यांचे योगदान काय आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. महत्वाचे म्हणजे, अमृता रॉय यांच्या उमेदवारीमुळे भाजपला मोठे बळ मिळेल. त्या महुआ मोईत्रा यांनाही टक्कर देऊ शकतात, असे निवडणूक तज्ज्ञांचे मत आहे.गेल्या निवडणुकीत महुआ यांचा मोठा विजय - टीएमसी नेत्या महुआ मोइत्रा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कृष्णानगर मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या त्यांना 614872 मते मिळाली होती. तर भाजपचे कल्याण चौबे यांना 551654 मतं मिळाली होती. महुआ मोइत्रा यांनी या निवडणुकीत 63218 मतांनी विजय मिळवला होता. या निवडणुकीतील महुआ यांना चोपडा, पलाशीपारा आणि कालीगंज विधानसभा मतदारसंघांतून मोठ्या प्रमाणावर मते मिळाली होती. गेल्या पाच वर्षांत कालीगंज विधानसभा मतदारसंघात भाजप मजबूत स्थितीत आला आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाMahua Moitraमहुआ मोईत्राTrinamool Congressतृणमूल काँग्रेस