शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

कर्नाटकचा गड राखण्यासाठी भाजपचं ट्रम्प कार्ड, या खास अभियानानं काँग्रेसला चीत करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 4:48 PM

कर्नाटकात राजकीय दृष्ट्या प्रभावी असलेला लिंगायत समाज जवळपास 17 टक्के आहे. या समाजाचे अधिकांश लोक राज्याच्या उत्तर भागात आहेत. या समाजाकडे भाजप आपला मजबूत समर्थक वर्ग म्हणून पाहते.

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) लिंगायत नेत्यांनी, सत्ताधारी पक्ष ‘लिंगायत विरोधी’ (Anti Lingayat) असल्याचे म्हणाऱ्या काँग्रेसला उत्तर देण्यासाठी आता कर्नाटकात ‘लिंगायत मुख्यमंत्री’ (Lingayat CM Campaign) अभियान अथवा मोहीम सुरू करण्यात यावी, असे म्हटले आहे. कर्नाटकात राजकीय दृष्ट्या प्रभावी असलेला लिंगायत समाज जवळपास 17 टक्के आहे. या समाजाचे अधिकांश लोक राज्याच्या उत्तर भागात आहेत. या समाजाकडे भाजप आपला मजबूत समर्थक वर्ग म्हणून पाहते.

भाजपला नुकसान होण्याचा अंदाज -लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सावदी यांनी 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने भाजपला सोडून काँग्रेसचा हात धरला आहे. तेव्हापासून काँग्रेसने भाजपवर लिंगायत समाजावर ‘अन्याय’ करत असल्याचा आणि ‘लिंगायतविरोधी’ असल्याचा आरोप करायला सुरुवात केली आहे. यामुळे सत्ताधारी भाजपने आपला बालेकिल्ला वाचविण्यासाठी आणि पक्षाचे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

लिंगायत सीएम अभियान चालवणार भाजप? -कर्नाटक भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी भाजपच्या लिंगायत नेत्यांची बैठक झाली. यावेळी, काँग्रेसच्या प्रचाराला शह देण्यासाठी भाजपने लिंगायत समाजाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करायला हवे आणि सत्तेवर आल्यास पुढचा मुख्यमंत्री लिंगायत समाजाचाच असेल, असा प्रचार करायला हवा, असा विचार समोर आला.

काय म्हणाले मुख्यमंत्री बोम्मई -मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी पत्रकारांसोबत बोलताना यासंदर्भात पुष्टी केली. ते म्हणाले, कॉंग्रेसकडून काही मुद्द्यांवर पसरवल्या जात असलेल्या चुकीच्या माहितीला रोख ठोक उत्तर देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. काही सूचनाही आल्या आहेत (लिंगायत मुख्यमंत्र्यासंदर्भात). यावेळी धर्मेंद्र प्रधान देखील तेथे उपस्थित होते. ते म्हणाले, आमच्या भावना (लिंगायत-मुख्यमंत्र्यासंदर्भात) हायकमांडपर्यंत पोहोचवचील.

टॅग्स :Karnatakकर्नाटकPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस