इव्हीएममुळेच गुजरातमध्ये भाजपाचा विजय- संजय निरुपम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 14:36 IST2017-12-18T13:58:40+5:302017-12-18T14:36:38+5:30
गुजरातमध्ये भाजपाला गड राखण्यात यश आलं आहे. भाजपाचा विजय जवळपास निश्चित आहे.

इव्हीएममुळेच गुजरातमध्ये भाजपाचा विजय- संजय निरुपम
मुंबई- गुजरातमध्ये भाजपाला गड राखण्यात यश आलं आहे. भाजपाचा विजय जवळपास निश्चित आहे. भाजपाच्या या यशावर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी जोरदार टीका केली आहे. संपूर्ण गुजरात भाजपाविरोधात होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या असायच्या. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपाचा विजय जनतेमुळे नाही तर इव्हीएममुळे झाला, असा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.
जब पूरा गुजरात #BJP के ख़िलाफ़ था,प्रधानमंत्री की सभाओं मे कुर्सियाँ ख़ाली दिखती थीं,तो उसे यह जीत गुजरात की जनता ने नहीं,#EVM ने दिलाई है।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) December 18, 2017
हमें पहले से यह आशंका थी।
सभी सावधान हो जाइए,भारतीय जनतंत्र के लिए यह बड़ा ख़तरा है।
गुजरात भाजपाविरोधात होता. नरेंद्र मोदींच्या सभेत खुर्च्या रिकाम्या होत्या. हा विजय गुजरातच्या जनतेमुळे नव्हे तर इव्हीएममुळे झाला, असा आरोप त्यांनी केला. आम्हाला आधीपासूनच इव्हीएममध्ये फेरफार होणार अशी शंका होती. सर्वांनी सावधान व्हावे, भारतीय लोकशाहीसाठी हा सर्वात मोठा धोका असल्याचं संजय निरूपम यांनी ट्विटकरून म्हटलं आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून भाजपाने विजयी आघाडी घेतली आहे. निवडणुकीत भाजपाने विजयी आघाडी घेतली. गुजरातमध्ये भाजप 182 पैकी 103 जागांवर आघाडीवर आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये 69 पैकी 43 जागांवर भाजप आघाडीवर आहे