वर्धा: राज्यासह देशावर कोरोनाचं संकट असताना त्यात म्युकर मायकोसिसची भर पडली. म्युकर मायकोसिसच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. या आजारावरील औषधं उपलब्ध होत असल्यानं समस्या वाढत आहेत. या परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नानं वर्ध्यात म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनची निर्मिती सुरू झाली आहे. वर्ध्यातल्या जेनेटेक लाईफ सायन्सेसनं Amphotericin B Emulsion इंजेक्शनचं उत्पादन केलं आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस विरुद्धच्या लढ्यात देशाला मोठी मदत होणार आहे. सध्याच्या घडीला देशातील केवळ एकच कंपनी Amphotericin B Emulsion इंजेक्शनची निर्मिती करत होती. त्यानंतर आता जेनेटेक लाईफ सायन्सेस ही या इंजेक्शनची निर्मिती करणारी दुसरी कंपनी ठरली आहे. यामुळे इंजेक्शनची टंचाई दूर होईल आणि रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव होणार नाही. सध्या बाजारात Amphotericin B Emulsion इंजेक्शनची कमतरता आहे. एका इंजेक्शनसाठी ७ हजार रुपये मोजावे लागतात. मात्र जेनेटेक लाईफ सायन्सेसनं तयार केलेल्या इंजेक्शनची किंमत १२०० रुपये असणार आहे. सोमवारपासून इंजेक्शनचं वितरण सुरू होईल.नमस्कार, राज बोलतोय! उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेल्या वृद्ध शिक्षिकेला मनसेप्रमुखांचा फोनकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आज ६४ वा वाढदिवस आहे. त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. योगायोगानं आजचं त्यांच्या कार्यालयाकडून जेनेटेक लाईफ सायन्सेसकडून तयार करण्यात आलेल्या इंजेक्शनची निर्मितीची माहिती देण्यात आली. या कंपनीला इंजेक्शनचं उत्पादन करता यावं यासाठी गडकरींनी पुढाकार घेतला होता. ही कंपनी १५ दिवसांत उत्पादन सुरू करेल, अशी माहिती गडकरींच्या कार्यालयाकडून १४ मे रोजी देण्यात आली होती. त्यानंतर १३ दिवसांत कंपनीनं उत्पादन सुरू केलं आहे.