संतोष ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आपापल्या जिल्ह्यात स्वत: बाजारात जावे, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत, तसेच नागरी पुरवठा व ग्राहक कल्याण मंत्रालयानेही आवश्यक वस्तंूचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत. लॉकडाऊनच्या १७ व्या दिवशीही पुरवठा व्यवस्थित नसल्याच्या माहितीच्या आधारे हे निर्देश देण्यात आले आहेत.बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, ओडिशा, प. बंगालसह अनेक राज्यांतून गव्हाचे पीठ, तांदूळ आदी आवश्यक वस्तूंचा तुटवटा असल्याच्या आणि त्यांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच एक आढावा बैठक घेतली होती. त्यांनी नागरी पुरवठा आणि ग्राहक मंत्रालयांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत.या मुद्यांवरही झाली चर्चाच्एप्रिलअखेरपर्यंत कोणत्याही राज्यात धरणे, निदर्शनांना परवानगी दिली जाऊ नये, विदेशी प्रवास न केलेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा पुन्हा शोध घेऊन तपासणी करावी.च्स्थलांतरित मजुरांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा छावण्या आणि अन्नछत्रांना भेट देऊन तेथे सोशल डिस्टन्सिंगचा आढावा घ्यावा.च्जिल्हा प्रशासन आणि प्रशासनाने संपूर्ण लॉकडाऊन असलेल्या भागात ड्रोनमार्फत व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्या आधारे आवश्यक पुरवठा, कायदा, सुव्यवस्था आणि सॅनिटायझिंगबाबत निर्णय घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
काळाबाजार रोखा; जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:46 IST