शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

काळे धन झाले आता जनधन

By admin | Published: May 27, 2017 2:49 AM

आतापर्यंत देशात काळे धन होते. आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे ते काळे धन आता जनधन आणि डीजी धन झाले आहे, बेनामी संपत्ती कायदा २८ वर्षांपूर्वी झाला

गुवाहाटी : आतापर्यंत देशात काळे धन होते. आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे ते काळे धन आता जनधन आणि डीजी धन झाले आहे, बेनामी संपत्ती कायदा २८ वर्षांपूर्वी झाला, पण आमच्याच सरकारने त्याची अमलबजावणी केली, असे सांगतानाच शेतकऱ्यांचे उत्पन्न २0२२ पर्यंत दुप्पट होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.मोदी सरकारला आज तीन वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त सरकारने या काळात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेताना पंतप्रधान म्हणाले की, मला प्रधान सेवक म्हणून काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी देशाच्या जनतेचे आभार मानतो. देशाच्या भल्यासाठी आम्ही जी पावले उचलली त्या प्रत्येक निर्णयात देशातील १२५ कोटी जनतेने साथ दिली, याचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. मी माझे मन, शरीर, आत्मा आणि आयुष्य देशाला समर्पित केले आहे असे मोदी सांगून ते म्हणाले की, विकास कायमस्वरुपी करायचा असेल तर, पायाभूत सुविधा पहिली गरज आहे. देशाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या सरकारने पायाभूत सोयी-सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या तीन वर्षांत जी ठोस पावले उचलली गेली त्यामुळे लोकांचे जीवनमान बदलले गेले आहे, असा दावा पंतप्रधान टिष्ट्वटरवर केला. त्यांनी २०१४ आणि २०१७ या कालावधीतील वेगवेगळ्या क्षेत्रांतील फरक दर्शवणारी आकडेवारीही दिली आहे. मोदी यांनी कृषी, मोबाईल बँकिंग, दूरध्वनीची घनता (टेले डेन्सिटी), महिलांचे सक्षमीकरण, मेक इन इंडिया, पर्यटन, विद्युतीकरण, सौर ऊर्जा आणि एलईडी बल्बचे वितरण आदी क्षेत्रांशी संबंधित आलेखही दिले. गुंतवणुकीला प्रचंड प्रोत्साहन मेक इन इंडियाचा संदर्भ देत मोदी यांनी म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक उत्पादनामध्ये गुंतवणुकीला प्रचंड प्रोत्साहन मिळाले आहे. या उद्योगातील गुंतवणुकीने २०१३-२०१४ मध्ये ११,१९८ कोटींवरून थेट १,४३,००० कोटींपर्यंत मजल मारली आहे. ‘डिजिटल इंडिया फॉर डेव्हलपड् इंडिया’ या मथळ्याखालील ग्राफिक्स म्हणते की, २०१३-२०१४ मध्ये आॅप्टिकल फायबर ब्रॉडबँड नेटवर्क ३५८ किलोमीटर होते ते आज २.०५,४०४ किलोमीटर झाले आहे.काँगे्रसची टीका; तीन वर्षांत ‘फुशारक्या अन् अतिशयोक्ती’काँग्रेसने मात्र आर्थिक आणि सामाजिक अंगांनी देशाचे भवितव्य अंधकारमय आहे, असे भाकीत केले असून, भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कारकीर्दीत देशाला संघर्ष बघावा लागेल, असा आरोप केला. सरकारच्या रोजगार धोरणाबद्दल श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. पक्षाचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी मोदी सरकारवर थेट हल्ला केला. गेल्या तीन वर्षांत या सरकारबद्दल सांगायचे तर ते एवढेच की ‘फुशारक्या, आलंकारिक भाषा आणि अतिशयोक्ती. ’ देशाने यापूर्वी कधीही अशी विभागणी पाहिली नव्हती. देश भविष्यात संघर्षाच्या काठावर उभा असल्याचे दिसत आहे, असे कमलनाथ म्हणाले.