नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान शाळा-महाविद्यालये बंद असून ऑनलाईन क्लासेसवर अधिक भर दिला जात आहे. अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच गरीब विद्यार्थ्यांसाठी काही जण पुढाकार घेत आहेत. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी एक शिक्षक प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या संकटात एका शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी घरासमोर 'शाळा' आणली आहे. मुलांसाठी त्यांनी मोहल्ला क्लासेस सुरू केले असून मुलांना त्यांच्या घराजवळ जाऊन शिकवत आहेत. आपल्या बाईकला एक ब्लॅकबोर्ड लावून ते प्रवास करतात आणि विद्यार्थ्यांना शिकवत असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुद्र राणा असं या शिक्षकाचं नाव असून ते छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचे शिक्षक आहेत. कोरोनाच्या संकटात ते वेगवेगळ्या परिसरात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.
मोहल्ला क्लास केला सुरू, सोशल डिस्टन्सिंगचं केलं जातं पालन
"कोरोना महामारीमुळे शाळा बंद आहेत. तसेच स्मार्टफोन नसल्याने अनेक विद्यार्थी ऑनलाईन क्लास अटेंड करू शकत नाही. अशात मुलांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना शिकवण्याचा विचार माझ्या डोक्यात आला. अत्यंत कमी मुलं ऑनलाईन क्लासला हजेरी लावतात. त्यामुळे मोहल्ला क्लास सुरू केला" अशी माहिती शिक्षकांनी दिली आहे. तसेच यामध्ये आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतो. त्यांच्या घरासमोर येऊन मी त्यांना शिकवतो. माझ्यासोबतच ब्लॅकबोर्ड, पुस्तकं आणि प्लेकार्डसदेखील असतात. मी घंटा वाजवतो आणि मुलं शाळेप्रमाणे हजर होतात. विद्यार्थी सुरुवातीची प्रार्थना करतात, त्यानंतर अभ्यासक्रमानुसार क्लास सुरू केला जातो" असं देखील रुद्र राणा यांनी म्हटलं आहे.
अभ्यासक्रमातील विषयांसोबतच कोरोनाचीही देतात माहिती
रुद्र हे विद्यार्थांना अभ्यासक्रमातील विषय शिकवतात. मात्र त्यासोबतच कोरोनासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती देखील देत आहेत. मुलांना देखील अशापद्धतीने अभ्यास करण्यात मजा येत असून या मोहल्ला क्लासला स्थानिक पाठिंबा देत असल्याचंही रुद्र यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांसाठी रुद्र राणा घेत असलेल्या मेहनतीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अशाच काही गरीब विद्यार्थ्यांसाठी एक पोलीस अधिकारी देवदूत ठरले आहेत.
कडक सॅल्यूट! 'मजुरांच्या मुलांवर मजुरीची वेळ येऊ नये म्हणून...', शिक्षणासाठी पोलिसाचा पुढाकार
कोरोनाच्या संकटात पोलीस आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करत आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. शांथप्पा जीदमनव्वर असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. कर्नाटकच्या बंगळुरूमधील अन्नपूर्णेश्वरी नगर परिसरात पोलीस उप-निरीक्षक शांथप्पा हे मजुरांच्या मुलांना मोफत शिकवत आहेत. ज्या मुलांकडे स्मार्टफोन, लॅपटॉप नाही अशा विद्यार्थ्यांना ते वेळात वेळ काढून शिकवतात.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : आनंदाची बातमी! प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीमध्ये अँटीबॉडी; सीरो सर्व्हेमधून दिलासा
बलात्कार करणाऱ्याला 'नपुंसक' करणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय