शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

अमरनाथ दहशतवादी हल्ला निंदनीय - अमेरिका

By admin | Published: July 12, 2017 9:56 AM

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनानं काश्मीर येथे अमरनाथ यात्रेदरम्यान झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनानं काश्मीर येथे अमरनाथ यात्रेदरम्यान झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी रात्री (10 जुलै ) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात अमरनाथ यात्रेकरुंचा मृत्यू झाला असून तीन पोलिसांसह 32 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरू आहेत. 
 
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते  हीथर नेयुएर्ट यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ते सर्व सामान्य नागरिक होते. प्रार्थनास्थळाकडे जात असताना त्यांच्यावर  हल्ला झाला. त्यामुळे ही बाब निंदनीय आहे. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती आम्ही शोक व्यक्त करत आहोत. दरम्यान, अमेरिकेतील खासदारांनीही या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. 
 
काँग्रेसचे सदस्य विल हर्ड म्हणाले की, हा हल्ला निंदनीय आहे आणि त्याचा निषेध केला गेला पाहिजे. तर काँग्रेसच्या सदस्य शीला जॅक्सन यांनी ट्विट केले आहे की, अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ला धक्कादायक आहे. धर्म हा एक मुलभूत अधिकार आहे. याप्रमाणे काँग्रेस अन्य सदस्यांनीही अमरनाथ दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. 
 
 
 
आणखी बातम्या वाचा
दहशतवादी संदीपचा भाऊ म्हणतो "त्याला गोळ्या घाला"
अमरनाथ यात्रा हल्ला; बस चालक सलीमच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे प्राण
अबू इस्माईलच हल्ल्याचा सूत्रधार
 
अमरनाथ हल्ल्याचा मुख्य सुत्रधार इस्माईलचं दोन वर्षांपासून भारतात वास्तव्य
दरम्यान, अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करुन सात जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद अबू इस्माईलसाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. लष्कर-ए-तोयबाने हा भीषण दहशतवादी हल्ला केला असून, अबू इस्माईल या हल्ल्याचा मास्टमाईंड असल्याचा संशय आहे. गेल्या 26 वर्षातील आतापर्यंतचा हा सर्वात भीषण हल्ला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी नागरिक असणा-या अबू इस्माईलने दोन वर्षांपूर्वी सीमा ओलांडून भारतात घुसखोरी केली होती. त्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये लष्कराचा स्थानिक कमांडर म्हणून काम करत होता. 
 
अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा तपास सुरु करण्यात आला आहे. नुकतीच तपासाला सुरुवात केली गेली असल्याने ठोस असे काही पुरावे हाती आलेले नाहीत. मात्र सुरक्षा यंत्रणांनी जी माहिती गोळा केली आहे, त्यानुसार अबू इस्माईलने तीन ते पाच दहशतवाद्यांसोबत हा हल्ला केल्याचं सिद्ध होत आहे. 
 
दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली असतानाही बसला सेक्युरिटी चेक पोस्टवरुन जाण्याची परवानगी कशी काय देण्यात आली याबाबत अद्याप स्पष्टता नाही. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी सांगितलं आहे की, "खूप मोठी त्रुटी आहे. सुर्यास्तानंतर बसला परवानगी देण्यात आली...असं का करण्यात आलं याचा तपास केला जाईल". घटनास्थळी 100 हून जास्त मोकळी काडतूसं सापडली आहे. यावरुन दहशतवाद्यांनी हल्ल्याचा कट आधीच रचल्याचं सिद्ध होत आहे. 
मुख्य हल्लेखोर इस्माईल पाकिस्तानी नागरिक असून, तो व पाकिस्तानीच असलेला अबू दुजाना याआधीही काश्मीरमधील अनेक अतिरेकी हल्ल्यांमध्ये सहभागी झाले आहेत. अबू इस्माईलसोबत जे दोघे होते, त्यांची ओळख पटली असून, जे त्यांना हल्ल्याच्या ठिकाणी घेऊ न आले आणि ज्यांनी शस्त्रे आणून दिली, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. हल्ल्यानंतर दहशतवादी कोणत्या दिशेने गेले, हे समजले असून, त्यांना लवकरच अटक होईल, असे जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
 
हल्ला करणाऱ्यांमध्ये अबू इस्माईल सहभागी होता, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सांगितले. ते म्हणाले की, हा हल्ला तैयबानेच केला. त्याची जबाबदारी अबू इस्माईलवर होती. त्याला स्थानिक दहशतवाद्यांनीही मदत केली, असेही मुनीर खान यांनी स्पष्ट केले. तैयबाने मात्र हल्ल्याचा निषेध केला. हा हल्ला इस्लामविरोधी आहे, अन्य धर्मीयांवर हल्ला वा हिंसाचार हे इस्लामला मान्य नाही, असे तैयबाचा प्रवक्ता अब्दुल्ला गझनवीने म्हटले आहे. मात्र याआधी अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या पाच हल्ल्यांमध्ये तयबाचाच हात होता.
 
सध्या थंड पडलेल्या जैश-ए-महमद या संघटनेला सक्रिय करण्यासाठीही तयबा प्रयत्नशील आहे. तयबाने स्थानिकांना जाळ्यात खेचण्याचे प्रयत्न चालविले आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये ३0 स्थानिक जण तैयबामध्ये सहभागी झाले असून, उत्तर काश्मीरमध्ये ८0 पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय आहेत.