भरुच : गुजरातमधल्या भरूच जिल्ह्यातील एक केमिकल फॅक्टरीत स्फोट झाला आहे. भरूचमधल्या दाहेज औद्योगिक क्षेत्रात एका फॅक्टरीत स्फोट झाल्यानंतर तिथं भीषण आग लागली आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून, ३२ जण जखमी आहे. या स्फोटात अनेक कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, जखमींची संख्या जवळपास ३२च्या आसपास सांगितली जात आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या केमिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाल आहे आणि 32 जण जखमी झालेत. कारखान्यात स्फोट कशामुळे झाला, याची कारणं अद्याप अस्पष्ट आहेत. अधिका-यांच्या माहितीनुसार, दुपारी 12च्या सुमारास कंपनीच्या केमिकल टाकीत भीषण आग लागली आणि हा अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीत स्फोट; पाच जणांचा मृत्यू, ३२ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 17:37 IST