श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधीलश्रीनगरमध्ये प्रवासी वाहनात स्फोट झाला आहे. हा स्फोट ट्युलिप गार्डनजवळ झाला. ज्या भागात ही घटना घडली, त्या भागात खूप गर्दी होती. या स्फोटात बस चालकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सिलिंडर फुटल्याने हा स्फोट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंटने (TRF) स्वत: या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे
दहशतवादी संघटनेने स्वत: घेतली जबाबदारी जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ही संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे. सोशल मीडिया पोस्टनुसार, द रेझिस्टन्स फ्रंटने सांगितले की, हल्ल्यात मॅग्नेटिक आयईडीचा वापर करण्यात आला आहे.
पार्किंगमध्ये झाला स्फोटया स्फोटात एका ऑटो चालकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते, मात्र आता डॉक्टरांचे म्हणणे आहे की ऑटो चालकाचा मृत्यू झाला नसून तो गंभीर जखमी आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, जम्मू जिल्ह्यातून आलेल्या व्हॅनच्या चालकाने पार्किंग परिसरात वाहनाचे मागील गेट उघडले असता हा स्फोट झाला. वाहनातील पर्यटक ड्रायव्हरला पार्किंगमध्ये सोडून फिरायला निघाले असतानाच हा स्फोट झाला. स्फोट झाला तेव्हा सर्व वाहने पार्किंगमध्ये उभी होती.
चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्माआज सकाळी सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत अन्सार गजवतुल हिंद आणि लष्कर-ए-तैयबा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचे दोन दहशतवादी मारले गेले. अंसार गजवतुल हिंदचा सफात मुझफ्फर सोफी उर्फ मुआविया आणि लष्कर-ए-तैयबाचा उमर तेली उर्फ तल्हा अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.