मोहाली - पंजाबच्या मोहाली शहरात गुप्तचर विभागाच्या इमारतीमध्ये रात्री स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनीस्फोटाची माहिती मिळताच, इमारतीला आणि परिसराला घेराव घातला असून तपास सुरू केला आहे. प्रथमदर्शनी हा दहशतवादी हल्ला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुदैवाने या स्फोटोत जिवीतहानी झाली नाही.
गुप्तचर विभागाच्या इमारतीमध्ये रात्री सव्वा दहा वाजता स्फोट झाल्याची माहिती आहे. इंटेलिजन्स विभागातील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रॉकेटसदृश्य वस्तू आदळल्याचं सांगितलं जातंय. ही रॉकेटसदृश्य वस्तू आदळल्यानंतर तिथे मोठा स्फोट झाला. या स्फोटात इमारतीचं नुकसान झालंय.
स्फोटाचं नेमकं कारण समोर येऊ शकलेलं नाहीये, पण अनेक अँगलने पोलिस स्फोटामागच्या कारणांचा शोध घेत आहेत. घटना घडल्याबरोबर मोहाली पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस घटनेची कसून चौकशी करत आहेत.