नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रणव मुखर्जी हे मुत्सद्दी आहेत, असे नंतर मोदी यांनी म्हणाले. मोदी यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, प्रणव मुखर्जी यांना भेटणे हा आयुष्य समृद्ध करणारा अनुभव असतो. त्यांचे ज्ञान, दूरदृष्टी यांना तोड नाही.मोदी सरकारने मुखर्जी यांना भारतरत्न किताबाने सन्मानित केले होते. मुखर्जी यांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीयवर्ष शिक्षावर्गामध्ये गेल्या वर्षी प्रमुख पाहुणे या नात्याने भाषण केले होते. द्वेषामुुळे भारताची राष्ट्रीय ओळख धोक्यात आली आहे, असा इशारा देऊन त्यांनी एक प्रकारे संघालाच खडे बोल सुनावले होते. ईव्हीएममध्ये फेरफार होण्याची शक्यता असल्याचा संशय विरोधी पक्षांनी व्यक्त केल्यानंतर, जनादेश पवित्र असून त्यात संशयाला जागा नसावी, असेही परखड मत मुखर्जी यांनी व्यक्त केले होते.>रजनीकांतने केले मोदींचे कौतुकपंतप्रधान नरेंद्र मोदी हे पं. जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी यांच्याप्रमाणे प्रभावी नेते आहेत, असे अभिनेते रजनीकांत यांनी म्हटले आहे. मोदी यांच्या गुरुवारी होणाऱ्या शपथविधीस उपस्थित राहाण्याचे आमंत्रण रजनीकांत व कमल हासन यांना पाठविण्यात आले आहे. रजनीकांत म्हणाले, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ नये. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षही बळकट असणे आवश्यक असते.
नरेंद्र मोदींनी घेतले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आशीर्वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 4:25 AM