शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

अंध श्रीकांतच्या कंपनीची 10 कोटींची उलाढाल

By admin | Published: April 07, 2016 2:12 PM

श्रीकांत अपंगत्वावर मात करत यशस्वीरीत्या हैदराबादशी संलग्न असलेल्या बोलंट कंपनीचा सीईओ झाला आहे.

ऑनलाइन लोकमतआंध्र प्रदेश, दि. ७- आंध्र प्रदेशमध्ये जन्मतःच अंध असलेल्या 24 वर्षीय श्रीकांत बोल्ला यानं एक कंपनी स्थापन करून त्या कंपनीचा तो सीईओ झाला आहे. श्रीकांतनं अपंगत्वावर मात करत यशस्वीरीत्या हैदराबादमध्ये एक कंपनी स्थापन केली आणि त्या बोलंट कंपनीचा श्रीकांत आता सीईओ झाला आहे.  श्रीकांत बोल्लानं लहानपणी वडिलांच्या शेतात काम करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला आंधळेपणामुळे वडिलांना शेतात मदत करण्यात अडचणी येत होत्या. अखेर वडिलांनी श्रीकांतला शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. घरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत श्रीकांत रोज पायी जात असे. तो शाळेतही नेहमी शेवटच्या बाकावर बसत होता. शाळेतली मुलं श्रीकांतसोबत मैत्री करण्यास टाळाटाळ करत होती. त्यावेळी जगातील आपण सर्वात गरीब विद्यार्थी असल्याची जाणीव झाली, असं श्रीकांत बोल्लानं सांगितलं. शाळेत असतानाच बुद्धिबळ आणि क्रिकेट खेळण्याची श्रीकांतला आवड निर्माण झाली. 10वीत असताना श्रीकांतनं 90 टक्के गुण मिळवून यश संपादन केलं. मात्र तो आंधळा असल्यानं त्याला सायन्सला प्रवेश देण्यात आला नाही. मी लोकांच्या नजरेत आंधळा होतो, म्हणून मला प्रवेश दिला नसल्याचं श्रीकांतनं तेव्हा सांगितलं. प्रत्येकाला त्यानं कॉमर्सला जावंसं वाटत होतं. मात्र त्याचा सायन्समध्येच करिअर निश्चय ठाम होता. माझ्या रक्तात काहीही दोष नसल्याचं सांगत मी सायन्समध्ये प्रवेश मिळवणार असं त्यावेळी बोल्लानं सांगितलं. सहा महिने न्यायासाठी कोर्टात त्यानं संघर्ष केला. न्यायालयीन लढ्यानंतर अखेर त्याला सायन्समध्ये प्रवेश देण्यात आला. मात्र चालू वर्षाच्या अर्ध्यापर्यंत बोल्लाला पुस्तक किंवा दुसरा अभ्यासक्रम देण्यात आला नव्हता. मग कॉलेजच्या मार्गदर्शकानं सर्व अभ्यासक्रम एका ऑडियो बुकमध्ये टाकून दिला. त्यावेळी बोल्लानं त्या ऑडियो अभ्यासक्रमाच्या जोरावर 98 टक्के गुण मिळवून नेत्रदीपक यश संपादन केलं. मात्र पुन्हा तो अंध असल्यानं त्याला स्पर्धात्मक परीक्षेला बसण्यास नकार दिला गेला. त्यावेळी त्यानं अमेरिकेतल्या एमआयटी या विद्यापीठात प्रवेशासाठी अर्ज केला. आणि त्याला प्रवेशही मिळाला. तेव्हा तो एमआयटीमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिला अंध विद्यार्थी म्हणून उत्तीर्ण झाला. 2012ला त्यानं एमआयटीतून पदवी संपादन केली. त्यानंतर त्यानं बोलंट इंडस्ट्रीची स्थापना केली. त्याच्या कंपनीत आज जवळपास 450 लोक काम करत आहेत. आणि स्वतःच्या कंपनीत त्यानं  60 टक्क्यांहून अधिक अपंगांना सामावून घेतलं आहे. बोल्लाच्या कंपनीनं आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटकमध्ये 5 कारखाने स्थापन केले आहेत. आंध्र प्रदेशमधल्या कारखान्यात जवळपास 10 ते 15 कोटींची गुंतवणूकही केली. आणि 10 ते 15 टक्के उत्पादन ते ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीला निर्यात करायला लागले. रस्त्यावर भिकारी दिसल्यास श्रीकांत त्याला पैसे न देता जगण्याची नवी आशा देत असे. त्यानं माजी पंतप्रधान एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबतही काम केलं होतं. आणि आता तो हैदराबादमध्ये स्थापन केलेल्या त्यांच्या कंपनीत सीईओ आहे. या कंपनीची उलाढाल आता जवळपास 10 कोटींच्या घरात आहे. या कंपनीत अशिक्षित आणि शारीरिक अपंगत्व आलेल्या लोकांनाच अधिक प्रमाणात सामावून घेण्यात आलं आहे. श्रीकांतची ही गगनभरारी अनेकांना थक्क करणारी आहे. .