ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - एका 13 वर्षांच्या मुलाला असा एक विचित्र आजार झाला आहे, की त्या आजाराचं निदान अद्याप डॉक्टरांजवळ नाही. दरम्यान, हा आजार जगातील काहीशा लोकांनाच झाल्याचे सांगण्यात येतं आहे.
अमर उजाला या संकेतस्थळानं दिलेल्या वृत्तानुसार, या मुलाच्या डोऴ्यातून रक्ताचे अश्रू वाहतात. एवढेच नव्हे तर कधी-कधी त्याच्या कान, तोंड, पाय आणि डोक्यातून रक्त वाहते. मध्यप्रदेशातील अखिलेश रघुवंशी या 13 वर्षीय मुलाला गेल्या तीन वर्षापासून हा आजार आहे. या आजारामुळे त्याला मोठा त्रास सहन करावा लागतो. तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदा अखिलेशच्या नाकातून रक्त आले. त्यावेळी त्याच्या घरच्यांना वाटले की डिहाइड्रेशनमुळे झाले असेल. मात्र, यानंतर अखिलेशच्या डोळ्यातून, डोक्यातून रक्त येऊ लागले.
कधी-कधी शरीराच्या कोणत्याही भागातून रक्त येण्यास सुरुवात होते. दिवसातून एकदा किंवा दहा वेळा असे होते. तसेच, गेल्या काही महिन्यापासून हा त्रास झाला नाही. मात्र 15 दिवसांपासून रोज माझ्या शरिरातून रक्त बाहेर येते, असे अखिलेशने सांगितले.