डेहणे महाविद्यालयात रक्तदान शिबिर
By admin | Published: September 26, 2015 7:26 PM
वाडा : डेहणे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाच्या खजिनदार व माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहिते, प्राचार्य डॉ. कांतिलाल पुराणे, उपप्राचार्य डॉ. विकास वीर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची रक्त व हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. शिवाय, य ावेळी ४० नारळाच्या झाडांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. टाकळकर, प्रा. शेवाळे, प्रा. माने, प्रा. सरजिने, प्रा. सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.
वाडा : डेहणे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाच्या खजिनदार व माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहिते, प्राचार्य डॉ. कांतिलाल पुराणे, उपप्राचार्य डॉ. विकास वीर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची रक्त व हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. शिवाय, य ावेळी ४० नारळाच्या झाडांचे रोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. टाकळकर, प्रा. शेवाळे, प्रा. माने, प्रा. सरजिने, प्रा. सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.फोटोओळ - कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, डेहणे (ता. खेड) येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना सुरेखा मोहिते व ईतर.०००