शेतकरी आंदोलनाचा फटका; हरियाणामधील पालिका निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का

By बाळकृष्ण परब | Published: December 30, 2020 01:47 PM2020-12-30T13:47:51+5:302020-12-30T13:51:02+5:30

Haryana Local body Election : हरियाणामध्ये नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांच्या मतमोजणीमध्ये अनेक ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

The blow of the peasant movement; BJP shocked in Haryana municipal polls | शेतकरी आंदोलनाचा फटका; हरियाणामधील पालिका निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का

शेतकरी आंदोलनाचा फटका; हरियाणामधील पालिका निवडणुकीत भाजपाला जोरदार धक्का

Next
ठळक मुद्देहरियाणामधील सोनीपत, अंबाला या पालिकांमध्ये भाजपाचे उमेदवार पराभूत झाले आहेतअंबाला महानगरपालिकेच्या निवडणुकीत शक्ती राणी यांनी भाजपा उमेदवार डॉ. वंदना शर्मा यांना पराभूत केले.सोनिपत महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या निखिल मदान यांनी भाजपाच्या ललित बत्रा यांना १३ हजार १८१८ मतांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले

चंदिगड - केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, या शेतकरी आंदोलनाचा फटका आता भाजपाला बसताना दिसत आहे. हरियाणामध्ये नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांच्या मतमोजणीमध्ये अनेक ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हरियाणामधील सोनीपत, अंबाला या पालिकांमध्ये भाजपाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. तर पंचकुला पालिकेमध्ये भाजपाकडे निसटती आघाडी आहे.

अंबाला महानगरपालिकेच्या निवडणुकीत शक्ती राणी यांनी भाजपा उमेदवार डॉ. वंदना शर्मा यांना पराभूत केले. शक्ति राणी यांना ३७ हजार ६०४ मते मिळाली. तर भाजपाच्या वंदना शर्मा यांना २९ हजार ५२० मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवार मीना अग्रवाल १३ हजार ७९७ मतांसह चौथ्या स्थानावर राहिल्या.

सोनिपत महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या निखिल मदान यांनी भाजपाच्या ललित बत्रा यांना १३ हजार १८१८ मतांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले. सिरसा वॉर्ड पोटनिवडणुकीत एचएलपीने पाठिंबा दिलेल्या उमेदवार निशा बजाय यांनी विजय मिळवला. तर भजपा-जजपा आघाडीच्या उमेदवाराची तिसऱ्या क्रमांकावर घसरगुंडी उडाली.

तर पंचकुला महानगरपालिकेमध्ये १३ व्या फेरीची मतमोजणी होईपर्यंत भाजपाचा उमेदवार आघाडीवर होता. भाजपाला २४ हजार मते मिळाली तर काँग्रेसला १९ हजार १४८ मते मिळाली होती.

Web Title: The blow of the peasant movement; BJP shocked in Haryana municipal polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.