शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 6:40 PM

Dharam Singh Chhoker : गेल्या विधानसभा निवडणुकीत धरमसिंह छौकर यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यांना ८१ हजारांहून अधिक मते मिळाली होती.

Haryana Elections 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने उतरले आहेत. मात्र, या विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने समलखा येथील काँग्रेसचे उमेदवार धरमसिंह छौकर यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. धरमसिंह छौकर यांच्याविरुद्धच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने २ ऑक्टोबरपर्यंत त्यांनी आत्मसमर्पण करावे, अन्यथा पोलिसांकडून अटक करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

काँग्रेस नेते आणि विद्यमान आमदार धरमसिंह छौकर यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतरही कोणतीही कारवाई झालेली नाही. अजामीनपात्र वॉरंट असतानाही धरमसिंह छौकर हे हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवत असून प्रचारही करत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, पानिपतमधील समलखा येथील स्वत:ला समाजसेवक म्हणवून घेणाऱ्या वीरेंद्र सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आहे.

याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि हरियाणा सरकारला १ ऑक्टोबर रोजी न्यायालयात उत्तर द्यायचे होते. यानंतर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने समलखाचे उमेदवार धरमसिंह छौकर यांना अटक करण्याचे आदेश दिले. दरम्यान, धरमसिंह छौकर आणि त्यांच्या मुलांविरुद्ध फसवणूक संबंधित अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत धरमसिंह छौकर यांनी मोठा विजय मिळवला होता. त्यांना ८१ हजारांहून अधिक मते मिळाली होती.

काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यतादरम्यान, हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा राज्यात प्रचारसभा घेत आहेत. सध्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी हरियाणात अनेक जाहीर सभांना संबोधित केले आहे. हरियाणातील आपला बालेकिल्ला आणखी मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. यावेळी हरियाणात भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एकमेकांना स्पर्धा करताना दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेसला एकही जागा गमवायची नाही. अशा परिस्थित उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या उमेदवारासह काँग्रेसच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Haryanaहरयाणाcongressकाँग्रेसHigh Courtउच्च न्यायालय