Bobby Kataria: सोशल मीडिया सेलिब्रिटी बॉबी कटारियाला उत्तराखंड पोलीस लवकरच अटक करणार आहेत. जिल्हा न्यायालयाने बॉबीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. डेहराडूनमध्ये रस्त्यावरील वाहतूक थांबवून मद्यप्राशन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याचा व्हिडिओही समोर आलाय, ज्यात तो रस्त्यावर बसून दारू पितोय. उत्तराखंडपोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. बॉबीवर पोलिसांना धमकावल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
उत्तराखंड पोलीस बॉबीच्या शोधातडेहराडून पोलिस स्टेशनचे अधिकारी राजेंद्र सिंह रावत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, बॉबीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक हरियाणा आणि लगतच्या राज्यांमध्ये पाठवण्यात आले आहे. बॉबी मूळचा हरियाणातील गुरुग्रामचा आहे. सोशल मीडियावर त्याचे 6.30 लाख फॉलोअर्स आहेत.
विमानात धुम्रपान केल्याचा आरोपयाआधी त्याच्यावर स्पाइसजेटच्या विमानात धुम्रपान केल्याचा आरोपही झाला होता. त्याचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात तो विमानात बसून सिगारेट ओढताना दिसतोय. त्याच्या या कृत्यामुळे विमानातील सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. एअरलाइन कंपनीने जानेवारीमध्ये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन कटारियावर 15 दिवसांसाठी प्रवासबंदी घातली होती. त्या व्हिडिओनंतर बॉबीने स्पष्टीकरण दिले होते की, तो व्हिडिओ खऱ्या विमानातला नसून एका डमी विमानातला आहे.