शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

बोधगया होणार आध्यात्मिक राजधानी

By admin | Published: September 06, 2015 4:10 AM

बोधगया ही ज्ञानार्जनाची भूमी आहे, असे सांगून केंद्र सरकारतर्फे हे स्थळ आध्यात्मिक राजधानीच्या रूपात विकसित करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली.

बोधगया : बोधगया ही ज्ञानार्जनाची भूमी आहे, असे सांगून केंद्र सरकारतर्फे हे स्थळ आध्यात्मिक राजधानीच्या रूपात विकसित करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली. यामुळे भारत आणि बौद्ध जगतातील सांस्कृतिक नाते अधिक दृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.मोदी यांनी येथे महाबोधी विहाराला भेट दिल्यानंतर उपरोक्त विचार मांडले. ते म्हणाले की, जगभरातील बौद्धबांधवांसाठी बोधगया हे एक श्रद्धास्थळ आहे. त्याअनुषंगाने या स्थळाचा विकास करण्याचा सरकारचा मानस आहे. याशिवाय या पवित्रस्थळावरून गरजू बौद्ध राष्ट्रांना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांच्या आध्यात्मिक गरजांची पूर्तता करण्यात येईल. भगवान बुद्ध हे भारताच्या मुकुटातील हिरा असल्याचे सांगून बुद्ध हे केवळ हिंदुवादासाठीच नव्हे, तर साऱ्या जगाच्या दृष्टीने एक महान सुधारक आहेत आणि त्यांनी जगाला दिलेला नवा दृष्टिकोन सर्वांच्याच अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. भारतात पूजेची सर्व माध्यमे स्वीकारार्ह आहेत. हिंदुवादाचा हा गुण म्हणजे अनेक महान आध्यात्मिक गुरूंचीच देण असून, गौतम बुद्ध यात प्रमुख आहेत. या देशाला धर्मनिरपेक्षतेचा वसाही या गुरूंच्या शिकवणीमुळे प्राप्त झाला आहे, असे ते म्हणाले. पंडित जवाहरलाल नेहरू आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर पंतप्रधानाच्या रूपात या पवित्र स्थळाला भेट देताना आपल्याला अत्यानंद होत असल्याची भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. त्यातही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी झालेली बोधगया भेट आपल्यासाठी अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरली असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, मोदी येथील जगविख्यात बोधिवृक्षाखाली ध्यानधारणेत सहभागी झाले.सामवेद-ग्लोबल हिंदू बुद्धिस्ट इनिशिएटिव्हद्वारे आयोजित संमेलनात बोलताना देशाने बुद्ध विचारसरणी आत्मसात केली असून, भारत हा ‘बुद्धिस्ट इंडिया’ असल्याचे त्यांनी सांगितले. समतेचा उपदेश करणारे भगवान बुद्ध महान होते, अशी भावना मोदी यांनी व्यक्त केली. या परिषदेला जपान आणि भूतानचे विदेशमंत्री, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोवील, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू तसेच श्रीलंका आणि नेपाळसह अनेक देशांचे मुत्सद्दी व खासदार उपस्थित होते. (वृत्तसंस्था)