ऑनलाइन लोकमत
मल्लपूरम, दि. 7- केरळमधील मल्लपूरम भागात एका कुटुंबाने घरातील मृत्यू झालेली व्यक्ती पुन्हा एकदा जिवंत होइल, या आशाने त्याचा मृतदेह तब्बल तीन महिने घरात ठेवल्याची घटना उघड झाली आहे. विशेष म्हणजे पतीच्या मृतदेहासमोर बसून त्यांची पत्नी आणि तीन मुलं तीन महिने मंत्र पठण करत होते. मृतदेहाशेजारी बसून प्रार्थना केल्याने काही तरी चमत्कार होईल असा त्यांचा विश्वास होता. याप्रकरणाची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. वी सैय्यद असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
सैयद्द हे काही काळासाठी विदेशात काही काळ काम करत होते त्यानंतर ते भारतात परतले आणि धार्मिक गुरू बनले होते. या महिलेच्या शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या घराचा दरवाजा बंदच होता. या कुटुंबाने गेल्या दोन वर्षांपासून शेजाऱ्यांबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले होते. याप्रकरणी शेजाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर बुधवारी पोलिसांच्या पथकाने दरवाजा तोडला. घरातील दृश्य पाहून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. घरातील जमीनीवर असलेल्या मृतदेहाचा पूर्णपणे सांगाडा झाला होता. तसंच सैयद्द यांची पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी मृतदेहाच्या शेजारीबसून मंत्र पठण करत होते.
आणखी वाचा
नऊ दिवस तो राहिला लहान भावाच्या मृतदेहासोबत
म्हैसूरमध्ये महिला लेक्चरर्सला साडी घालून येण्याचं फर्मान
परवेजने अनेक मुलींना फसविल्याचा संशय
पोलिसांसह काही स्थानिक लोकही तेथे उपस्थित होती. त्यांच्या माहितीनुसार कुटुंबातील चारही जण मृतदेहाला घेरून प्रार्थना करत होते. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबातील सगळ्या सदस्यांना ताब्यात घेऊन त्या मृतदेहाला मांजरेतील सरकारी वैद्यकीय रूग्णालयात तपासणीसाठी पाठवलं आहे. या कुटुंबातील सदस्य कुणाशीही संबंध ठेवत नाहीत तसंच नेहमी स्वतःच्याच दुनियेत असतात, असंही स्थानिकांनी सांगितलं आहे.
प्राथमिक तपासणीमध्ये सैयद यांच्या मृत्यमागे कुठल्याही प्रकारचा कट असेल याचा संशय येत नाही, या व्यक्तीचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याचा शोधा घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. जर हा नैसर्गिक मृत्यू असेल तर या प्रकरणात पुढे चौकशी करण्यासारखं काहीही नाही, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, कुटुंबातील सदस्यांना चौकशी करून सोडून देण्यात आलं आहे.