खराब हवामानामुळे शोधमोहीम थांबविली : सात मृतदेह सापडले, ओळख पटविण्यासाठी पीडित कुटुंबियांचे डीएनए नमुने घेणारजकार्ता/सिंगापूर : खराब हवामानामुळे एअर आशियाच्या अपघातग्रस्त विमानाचे अवशेष शोधण्याच्या कामात अडथळे येत असून, शोधकाम थांबविण्यात आले आहे. जावा समुद्रातील भरतीच्या लाटांमुळे अपघातग्रस्त विमान अपघात झालेल्या ठिकाणापासून बरेच दूरपर्यंत लोटले गेले आहे. अपघातग्रस्त विमान समुद्रात कोसळताना एकसंध असावे, असे मानले जात आहे. विमानातून आतापर्यंत सात मृतदेह वर काढण्यात आले असून, त्यातील एका मृतदेहाच्या अंगावर लाईफ जॅकीट आहे. त्यामुळे अपघात कसा झाला असावा याबद्दल पुन्हा विचार केला जात आहे. १६२ लोकांसह इंडोनेशियातील सुराबाया ते सिंगापूरला जाणाऱ्या क्यूझेड ८५०१ या विमानाला रविवारी अपघात झाला असून, मुसळधार पाऊस, वारे व दाट ढग यामुळे बुधवारीही अपघातग्रस्त विमानाचा शोध घेणे थांबविण्यात आले आहे. वर काढलेल्या सात मृतदेहांपैकी एक महिला फ्लाईट अटेंडंटचा असून तिच्या अंगावर एअर एशियाचा गणवेश आहे, असे इंडोनेशियाच्या शोध संस्थेचे प्रमुख बाम्बांग सोएलिस्तो यांनी सांगितले. विमानातील अवशेषातून वर काढलेले पहिले दोन मृतदेह सुराबाया येथे आणण्यात आले. तिथे नातेवाईक मृतदेहांची वाट पाहत आहेत. सुराबाया येथे सैनिकांनी दोन मृतदेह आणले असून, नातेवाईकांना डीएनएचे नमुने देण्यास सांगण्यात आले आहे. सिंगापूरला जाणाऱ्या या विमानाला अपघात होऊन तीन दिवस उलटल्यानंतर मंगळवारी विमानाचे अवशेष पांगाकलान्बूनजवळ कारीमाता खाडीत सापडले. समुद्रात अनेक मृतदेह तरंगत असल्याचे शोधमोहीमेतील सदस्यांना दिसले असून, ते बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. भरती व मुसळधार पाऊस यामुळे मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले आहे. हवामान सुधारले की मदतकार्य पुन्हा चालू केले जाईल. मृतदेह पांगकलान बन येथे आणले जातील. या दुर्दैवी विमानातील १६२ प्रवाशांचे नातेवाईक परस्परांना मिठी मारून अश्रुपात करीत आहेत. समुद्रावर तरंगणाऱ्या मृतदेहांची छायाचित्रे टीव्हीवर पाहिल्यानंतर काल अनेकांना भावना अनावर झाल्या. अपघातग्रस्त विमानात १५५ प्रवासी होते. त्यात १ ब्रिटिश, १ मलेशियन, १ सिंगापुरी व ३ दक्षिण कोरियाचे होते, १४९ प्रवासी इंडोनेशियाचे होते. सात कर्मचारी, त्यातील सहा इंडोनशियाचे व एक सहवैमानिक फ्रेंच होता. प्रवाशांमध्ये १७ लहान मुले होती. प्रवाशांमध्ये भारतीय नागरिक नव्हते. या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटल्यानंतर नक्की काय झाले हे गूढ अद्याप उलगडलेले नाही. (वृत्तसंस्था)च्सोनार प्रतिमानी समुद्राच्या तळाशी असणारे अवशेष एअर आशियाच्या अपघातग्रस्त विमानाचेच असल्याचे शोधल्यानंतर मृतदेह व ब्लॅकबॉक्स शोधण्यासाठी पाणबुडे तैनात करण्यात आले; पण खराब हवामानामुळे शोध थांबवावा लागला.च्जोरदार लाटांमुळे अवशेष पुढे लोटले जात असून, मंगळवारी आढळलेल्या ठिकाणापासून बुधवारी ते ५० कि.मी. पुढे गेले आहेत. मृतदेह आता किनाऱ्याला लागतील, असे व्हाईस एअर मार्शल सुनारबोवो सांदी यांनी सांगितले.
विमानातील एक मृतदेह लाईफ जॅकेट घातलेला
By admin | Published: January 01, 2015 3:20 AM