मृतदेह पोलीस स्टेशनला नेणे पडले महागात
By admin | Published: June 26, 2016 6:25 PM
जळगाव: आंबेडकर नगरातील शुभम चंद्रमणी तायडे (वय १५) या दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न नेता पोलीस स्टेशनला नेणे आंदोलनकर्त्यांना चांगलेच महागात पडले आहे. मृतदेहाची विटंबना व जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने दोन प्रकारचे गुन्हे आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आले आहे.
जळगाव: आंबेडकर नगरातील शुभम चंद्रमणी तायडे (वय १५) या दहावीच्या विद्यार्थ्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न नेता पोलीस स्टेशनला नेणे आंदोलनकर्त्यांना चांगलेच महागात पडले आहे. मृतदेहाची विटंबना व जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने दोन प्रकारचे गुन्हे आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आले आहे.शुभमचा शुक्रवारी सकाळी आठ वाजता घरात विजेच्या धक्कयाने मृत्यू झाला. दरम्यान, हा अकस्मात मृत्यू नसून त्याला पाच जणांनी मारल्याचा आरोप करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरत नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलीस प्रशासन कुठलेच ठोस आश्वासन देत नसल्याचे पाहून दुपारी शुभमचा मृतदेह शनी पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आला होता. १२ जणांवर गुन्हा दाखल वर्षा रोहीदास साळवे, भरत पंडीत सोनवणे, दीपक पोपट पवार, सुरेश पोपट पवार यांच्यासह इतर १० ते १२ पुरुष महिला यांच्याविरुध्द कलम १४३, २९७, ५०४ अन्वये तसेच जमावबंदी आदेशाचे मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) जे उल्लंघन कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉन्स्टेबल संदीप माने यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.