ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३ - अमेरिकेतील आघाडीची विमान उत्पादक कंपनी बोईंगचा भारतात F/A - 18 सुपर हॉरनेट फाईटर जेट विमानांची निर्मिती करण्याचा विचार आहे. आम्ही सुपर हॉरनेटकडे एक संधी म्हणून पाहत आहोत. या प्रकल्पाव्दारे थेट मेक इन इंडिया मोहिमेमध्ये सहभागी होण्याची कंपनीची योजना आहे.
बोईंगचे सीईओ डेनिस म्युलेनबर्ग यांनी हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. भारताचा औद्योगिक विस्तार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया मोहिम आखली आहे. भारत फ्रान्सच्या दासॉल्ट एव्हिएशनकडून ३६ रफाएल लढाऊ विमाने विकत घेणार आहे.
भारताने एमएमआरसीए लढाऊ विमानांसाठी निविदा मागवल्या त्यात बोईंगनेही निवदा भरली होती. मात्र भारताने खरेदीसाठी फ्रान्सच्या रफाएलला पसंती दिल्याने बोईगची निविदा बाद झाली होती. बोईंगने पुन्हा एकदा भारताची गरज लक्षात घेऊ लढाऊ विमानांच्या विक्रीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.