शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

अ‍ॅलोपॅथी वादात अक्षय कुमारची एन्ट्री? म्हणाला...; बाबा रामदेवांनी शेअर केले दोन व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 7:18 PM

बाबा रामदेव आणि अ‍ॅलोपॅथिक डॉक्‍टर यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. यातच योग गुरूंनी सोमवारी अक्षय कुमारचे दोन तर अमिरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे...

नवी दिल्‍ली - आता अ‍ॅलोपॅथीविरुद्ध आयुर्वेद वादात अभिनेता अक्षय कुमारची  एन्ट्री झाली आहे. ही एन्ट्री नक्कीच थेट नाही, पण या प्रकरणात आता तोही पक्षकार नक्कीच बनला आहे.  खरे तर, बाबा रामदेव यांनी आपल्या बोलण्याच्या समर्थनार्थ अभिनेत्याचे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. यात अक्षयने आयुर्वेदाचे उघडपणे समर्थन केले आहे. त्याने म्हटले आहे, की पारंपरीक भारतीय वैद्यक शास्त्रात असा कुठलाही आजार नाही, ज्यावर उपचार नाही.

बाबा रामदेव आणि अ‍ॅलोपॅथिक डॉक्‍टर यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. यातच योग गुरूंनी सोमवारी अक्षय कुमारचे दोन व्हिडिओ शेअर करत ट्विट केले आहेत. अक्षयच्या हवाल्याने त्यांनी लिहिले आहे, 'आपण स्वतःच आपल्या बॉडीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बना. साधे आणि निरोगी आयुष्य जगा आणि जगाला दाखवून द्या, की आपल्या हिंदुस्तानी योग आणि आयुर्वेदात जे सामर्थ्य आहे, ते कुठल्याही इंग्रजाच्या केमिकल इंजेक्शनमध्ये नाही - अक्षय कुमार'.

अ‍ॅलोपॅथीनं कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले हे मान्य, पण आयुर्वेदाचाही सन्मान केला पाहिजे : बाबा रामदेव

व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणाला अक्षय कुमार? -व्हिडिओमध्ये अक्षय कुमार म्हणाला, शरीरात असा एकही आजार नाही, ज्यावर आपल्या पारंपरिक भारतीय वैद्यक शास्त्रात उपचार नाही. देशात आयुष मंत्रालय आहे, जे उपचाराच्या पर्यायी व्‍यवस्‍थेला उत्तेजन देते. अनेक वर्षांपासूनची आपली ही उपचार पद्धती केवल नेच्यूरलच नाही, तर शास्त्रीयदेखील आहे. प्रत्येक उपचाराच्या पाठीशी एक ठोस तर्क आहे. पण, दिव्याखालीच अंधार आहे. बेस्‍ट उपचार देशात आहे. मात्र, आपण तो शोधण्यासाठी बाहेर जातो.

अक्षयने सांगितले, त्याने नुकतेच एका आयुर्वेदिक आश्रमात काही दिवस घालवले. त्या आश्रमात तो एकटाच भारतीय होता. बाकी सर्व जण परदेशातील होते. जर परदेशातील लोक आपल्या देशात बरे होत असतील, तर आपण का नाही? याच वेळी त्याने लोकांना आवाहन केले, की आपण कुण्या एखाद्या आयुर्वेदीक सेंटरचे बँड अ‍ॅम्बेसेडर बनून हे बोलत आहोत, असे कुणीही समजू नये. मी हे सर्व स्वतःच्या बॉडीचा ब्रँड अम्बेसेडर होऊन बोलत आहे, असेही अक्षय म्हणाला. यावेळी लोकांनीही त्यांच्या बॉडीचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हावे. साधे आणि निरोगी आयुष्य जगावे. जगाला दाखवावे, की आपल्या भारतीय योग आणि आयुर्वेदात जी शक्ती आहे, ती कुठेही नाही, असेही अक्षय म्हणाला.

अक्षय म्हणाला, आपण भारतीय आपल्या गोष्टींची किंमत केव्हा ओळखणार. परदेशातील लोक येथे येऊन उपचार घेत आहेत. 'मला अ‍ॅलोपॅथिक उपचार आणि औषधांचा काही प्रॉब्‍लेम नाही. ते त्यांच्या जागी चांगलेच आहे. मात्र, आपण उपचाराची आपली पारंपरीक पद्धत का विसरत आहोत.'

बाबा रामदेव यांच्याविरोधात डॉक्टर्स 1 जूनला देशभर 'काळा दिवस' साजरा करणार!

आमिर खानचा एक जुना व्हिडिओही केला शेअर -यातच बाबा रामदेव यांनी अभिनेता आमिर खानचाही एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ टीव्ही शो 'सत्यमेव जयते'चा आहे. यात डॉ. समित शर्मा यांना जेनेरिक आणि ब्रँडेड औषधी यांतील किंमत आणि फरक समजावताना दाखवले आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत, मेडिकल माफियांत हिम्मत असेल, तर त्यांनी आमिर खान विरोधात मोर्चा उघडून दाखवा, असे आव्हानही बाबा रामदेव यांनी केले आहे. 

टॅग्स :Akshay Kumarअक्षय कुमारBaba Ramdevरामदेव बाबाAyurvedic Home Remediesघरगुती उपायmedicinesऔषधं