शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

“शाहरूख खाननं ठेवलं माझ्या मोठ्या मुलीचं नाव, कुटुंबाशी ३० वर्षांपासूनच नातं”

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2023 8:15 PM

महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची माहिती.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावर निरनिराळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीदेखील यावर प्रतिक्रिया देत देश कशाप्रकारे पुढे जात आहे याची झलक यातून दिसत असल्याचं म्हटलं. पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटींचा अर्थसंकल्प हा भविष्याचा अर्थसंकल्प असल्याचे सिद्ध करतो. पायाभूत सुविधांतर्गत जेव्हा रस्ते आणि विमानतळ बांधले जातील, तेव्हा आजच्याच नव्हे, तर १०-१५ वर्षांनंतरही देशाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील, असं त्या म्हणाल्या.

आजतक कार्यक्रमात स्मृती इराणी या सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी शाहरुख खानसोबतच्या आपल्या कौटुंबीक नात्याबाबतही वक्तव्य केलं. स्मृती इराणींना पठाण चित्रपट आणि बॉयकॉट बद्दल प्रश्न विचारण्यात आला. “लोकांना कदाचित माहित नसेल की माझ्या मोठ्या मुलीचे नाव शाहरुख खाननं ठेवलं आहे. माझे पती आणि शाहरुखची ३० वर्षे जुनी मैत्री आहे. त्यामुळे जे काही सांगितलं जात आहे ते पूर्ण सत्य नाही. कलाकाराचा आजही आदर केला जातो. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर भाष्य करणे योग्य होणार नाही,” असं यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या.

मर्यादेत राहून विरोध कराफ्रीडम सर्वात जवळचे आहे, त्याबाबत पक्षपात होता कामा नये, असंही त्या म्हणाले. कुणाला काही पटत नसेल तर मर्यादेत राहून निषेध केला पाहिजे. काँग्रेसमध्ये असे नेते आहेत, ज्यांनी महिलांबद्दल असभ्य टिप्पण्या केल्या आणि राहुल गांधी तसंच सोनिया गांधींनी त्यांचा प्रचार केला. आजच्या तारखेला प्रेक्षकांकडे अनेक पर्याय आहेत, तो मल्टिप्लेक्सपेक्षा कमी किंमतीत OTT वर गोष्टी पाहू शकतो. म्हणूनच जर कंटेंट चांगला असेल तर लोक तो बघायला नक्कीच येतील. चित्रपटाच्या अपयशाचा संबंध केवळ बॉयकॉट टोळीशी जोडता कामा नये, असंही स्मृती इराणी यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Shahrukh Khanशाहरुख खानSmriti Iraniस्मृती इराणी