शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

"द बेस्ट ऑस्कर एव्हर" म्हणत, राम गोपाल वर्मांनी उडवली PM मोदींची खिल्ली, Video शेअर करत साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 10:35 AM

मोदींची खिल्ली उडवताना, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ऑस्कर सोहळ्यातील एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे.

मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) सध्या चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत राहत आहेत. देशात घडणाऱ्या अनेक घटनांवर ते प्रतिक्रिया देताना दिसतात. यावेळी त्यांनी एक मॉर्फ व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) खिल्ली उडवली आहे. (bollywood director ram gopal varma share video about pm narendra modi)

मोदींची खिल्ली उडवताना, दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ऑस्कर सोहळ्यातील एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. हा एक एडिटेड मॉर्फ व्हिडिओ आहे. या व्हिडिओत अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स ऑस्कर विजेत्याचे नाव घोषित करत असते. यावेळी मोदींच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील भावूक भाषणाची झलक दाखवण्यात आली आहे आणि त्यानंतर तो ऑस्कर पुरस्कार मोदींनाच मिळतो, असे दाखवण्यात आले आहे. या व्हिडिओच्या शेवटी अभिनेत्री जेनिफर "अँड ऑस्कर गोज टू", असे म्हणते आणि त्यानंतर स्क्रिनवर ऑस्कर पुरस्कार घेतलेले 'एडिटेड' मोदी दिसतात आणि सभागृहातील लोक टाळ्या वाजवतात.

भाजपचं ठरलंय! दिल्लीतून सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र; नेतृत्त्वानं घेतला महत्त्वाचा निर्णय

वाराणसीतील डॉक्टरांशी बोलताना भावूक झाले होते मोदी - पंतप्रधान मोदी कोरोना व्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरातील जिल्हाधिकारी, डॉक्टर्स, पॅरामेडीकल स्टाफ आणि फ्रंटलाईन वर्कर्सं यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमाने संवाद साधत आहेत. याच एक भाग म्हणून मोदींनी शुक्रवारी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्संशी संवाद साधला. यावेळी, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते. 

पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधील डॉक्टरांशी बोलताना प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. मात्र, कोविडच्या लढाईत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचा उल्लेख करताना मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या लढाईत आपण अनेक आप्तेष्ठांना गमावले आहे. मी काशीचा एक सेवक असून काशीतील प्रत्येकाचे आभार मानतो. विशेषत: डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर आरोग्य सेवकांनी जे काम केले, ते कौतुकास्पद आहे. या महामारीने आपल्या जवळील माणसे नेली आहेत. त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असे म्हणत मोदी भाऊक झाले होते.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! 1.5 कोटी कामगारांना थेट लाभ, हाती जास्त पैसे येणार

टॅग्स :Ram Gopal Varmaराम गोपाल वर्माNarendra Modiनरेंद्र मोदीOscarऑस्करbollywoodबॉलिवूडprime ministerपंतप्रधान