मुंबई -बॉलिवूड क्विन कंगना रणौत तिच्या खळबळजनक वक्तव्यांमुळे आणि दाव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहते. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर, सुशांतने बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून आत्महत्या केली, असे कंगणाने म्हटले होते. एढेच नाही, तर तिने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनाही आपल्या निशाण्यावर घेतले होते. आता, आपण केलेले आरोप सिद्ध करू शकलो नाही, तर पद्मश्री पुरस्कार परत करेन, असे कंगनाने म्हटले आहे.
कंगनाने रिपब्लिक टीव्हीला एक मुलाखत दिली आहे. यावेळी, "मला मुंबई पोलिसांनी बोलवले होतो. पण त्यांनी जेव्हा बोलावले, तेव्हा मी मनालीमध्ये होते. यामुळे माझा जबाब रेकॉर्ड करण्यासाठी कुणालाही पाठवावे, अशी विनंती मी त्यांचाकडे केली. मात्र, माझ्या विनंतीवर मुंबई पोलिसांकडून काहीही उत्तर मिळाले नाही. मी तुम्हाला सांगते, जर मी, असे काही बोलले असेल, जे मला सिद्ध करता येणार नाही, तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करीन," असे कंगनाने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी कंगना रणौतने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्तेनंतर एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये तिने अनेक गंभीर आरोप केले होते. यात सुशांतचा बळी इमोशनल, सायकोलॉजिकल आणि मेन्टल लिंचिंगमुळे झाल्याचे तिने म्हटले होते.
काय म्हणाली होती कंगना -“सुशांतच्या हत्येनंतर बर्याच गोष्टी समोर आल्या आहेत. काही गोष्टी मी वाचल्या तर काही लोकांशी मी संवाद साधला. त्याच्या वडील म्हणणे आहे की, चित्रपटसृष्टीतील तणावामुळे तो त्रस्त होता. दिग्दर्शक अभिषेक कपूरचे म्हणणे आहे की, त्याला पद्धतशीरपणे तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या म्हणण्यानुसार, सर्वाजनिक त्याचा झालेला अपमान तो सहन करु शकला नाही. या चित्रपट माफियांनी अत्यंत पद्धतशीरपणे सुशांतची बदनामी केली. त्याचे नाव न घेता त्याला अप्रत्यक्षपणे वाळीत टाकण्याचे प्रकार सुरू केले. ज्यामुळे हळूहळू सुशांत नैराश्याच्या गर्तेत गेला. अनेक सो कॉल्ड पत्रकारांनी त्याच्याबद्दलच्या खोट्या बातम्याही पसरवल्या.” असेही कंगनाने म्हटले होते.
या व्हिडिओत कंगनाने सुशांतबाबत छापून आलेल्या अनेक बातम्याही वाचून दाखलल्या होत्या. कंगना म्हणाली होती, ''एका वेबसाइटने लिहिले आहे की, सुशांत एका ट्रक ड्रायव्हरसारखा वाटतो. दुसऱ्या बातमीत लिहिण्यात आले की, त्याने एका पार्टीत तमाशा करून एका दिग्दर्शकाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. एक वेबसाईटने असे लिहिले होते की, सुशांत मीटूमुळे जेलमध्ये जाऊ शकतो. सुशांत सिंग राजपूत विरोधात, अशा अनेक खोट्या बातम्या लिहिण्यात आल्या.''
महत्त्वाच्या बातम्या -
छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कंगना भडकली; म्हणाली…
CoronaVirus : खूशखबर! जगातली पहिली कोरोना लस ऑगस्टमध्ये येणार, 'हा' देश 3 कोटी डोस बनवणार
रशियाचं नवं 'ब्रह्मास्त्र' S-500, आकाशात उपग्रहांचाही करेल खात्मा
गुडन्यूज! : अमेरिकेची लस अखेरच्या टप्प्यात; निकालानंतर वैज्ञानिकही आनंदात
"चीनकडून लाच घेतायत नेपाळचे पंतप्रधान ओली, स्विस बँकेच्या खात्यात ठेवले आहेत कोटीच्या कोटी"
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप
खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा