कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत सुरु झालेला राजकीय युद्ध अजूनही थांबायचे नाव घेत नाही. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. दलू शेख नावाच्या भाजप कार्यकर्त्याच्या घरावर गावठी बॉम्बने हल्ला करण्यात आला असून, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. तर हा हल्ला तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे.
भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील राजकीय युद्ध लोकसभा निवडणुकीनंतर ही सुरूच आहे. शनिवारी पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात दलू शेख या भाजप कार्यकर्त्याच्या घरावर हल्लेखोरांनी गावठी बॉम्बने हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या दलू शेख याचा मृत्यु झाला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून तपासानंतरह त्याच्या मृत्युचं नेमकं कारण समोर येईल.
तृणमूल काँग्रेस पक्षाकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना नेहमीच टार्गेट केलं जात आहे. या आधी सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे दोषींना सोडून देता कामा नये, असे प्रदेश भाजपचे महासचिव सायंतन बसू यांनी म्हंटले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये पुन्हा राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.