, फोरेन्सिक पथकाकडून तपासणी
बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफे या हॉटेलमध्ये शुक्रवारी बॉम्बस्फोट घडविण्यात आला. त्यात ९ जण जखमी झाले असून कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही. या बॉम्बस्फोटामागे कोणाचा हात आहे, हे आम्ही शोधून काढू, असे कर्नाटक पोलिसांनी म्हटले. हा आयईडीचा स्फोट असण्याची शक्यता आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
बॉम्बस्फोट झालेल्या हॉटेलमध्ये फोरेन्सिक पथकाने येऊन तपासणी केली, तसेच बंगळुरूचे पोलिस आयुक्त व अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. शुक्रवारी दुपारी एक वाजता हा बॉम्बस्फोट झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
१२ नंतर हॉटेलमध्ये एक व्यक्ती बॅग ठेवून गेली nरामेश्वरम कॅफेमध्ये आयइडीचा स्फोट झाला असण्याची शक्यता आहे असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. nशुक्रवारी दुपारी १२ वाजल्यानंतर या हॉटेलमध्ये एक व्यक्ती बॅग ठेवून तिथून निघून गेली. त्यात आयईडी असावा अशी शक्यता आहे. रामेश्वरम कॅफे तसेच परिसरातील सीसीटीव्हींच्या फुटेजटी तपासणी केली जात आहे. nहॉटेलमध्ये झालेला बॉम्बस्फोट हे दहशतवादी कृत्य आहे का हे आताच सांगता येणार नाही. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्याबद्दल सांगता येईल असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.