एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटने चाललेल्या एक प्रवाशाने, आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचे स्टाफला सांगितले आणि एकच खळबळ उडाली. संबंधित व्यक्तीने ट्रांझिट चेकिंग दरम्यान स्टाफला बॅगमध्ये बॉम्ब असल्याचे सांगितले. यानंतर, एअरलाइन्स स्टाफने ताबडतोब 'बॉम्ब थ्रेट असेसमेंट कमिटी'ला (बीटीएससी) यासंदर्भात माहिती दिली, यावर संबंधित टीम ताबडतोब घटनास्थळी पोहोचली. टीमने लगेच प्रवाशाची बॅग चेक करायला सुरुवात केली.
मात्र, प्रवाशाच्या बॅगमध्ये बॉम्ब होता की नाही, यासंदर्भात अद्याप कसलीही माहिती मिळू शकलेली नाही. सर्वसाधारणपणे, अशा प्रकरणांमध्ये बॉम्ब असण्याची सूचना खोटी असते. यापूर्वीही अनेकांनी अशा प्रकारच्या धमक्या दिल्या आहेत. मात्र तपासात त्यांच्या बॅगमध्ये काहीही आढळून आलेले नाही. मात्र, बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर, एअरपोर्ट प्रशासनाला नियमाप्रमाणे ताबडतोब अॅक्शन घ्यावी लागते आणि एसओपीअंतर्गत बॅग आणि प्रवाशाची चौकशी करावी लागते.
मंगळवारीही घडली होती अशीच घटना -लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये मंगळवारी (25 जून) बॉम्ब असल्याची महिती मिळाली होती. मात्र तपासात ही माहिती अफवा असल्याचे समोर आले. ज्या व्यक्तीने कॉल करून फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची धमकी दिली होती. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, कॉल करणारी संशयित व्यक्ती कोचीवरून आपल्या कुटुंबासोब एअर इंडियाची फ्लाइट पकडत असतानाच त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव सुहैब असे आहे. तो 30 वर्षांचा आहे. तो एअर इंडिया स्टाफच्या सर्व्हिसवर नाराज होता.