शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
2
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
3
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
4
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
5
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
8
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
9
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
10
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
11
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
12
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
13
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
14
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
15
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
16
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
17
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
18
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
19
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
20
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू

3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 5:26 PM

गृह मंत्रालयाने आज MoCA आणि BCAS सोबत या धमक्यांबाबत चर्चा केली.

Bomb Threat To Indian Airplans : देशातील विमान वाहतुकीबाबत धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या तीन दिवसांत डझनभर विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. मात्र, चौकशीत सर्व धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. आता केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकरणात लक्ष घातले असून, अशा खोट्या धमक्यांबाबत कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. बुधवारी गृह मंत्रालयाने एमओसीए आणि बीसीएएसशी या धमक्यांवर चर्चाही केली.

सरकारी सूत्रांनुसार, बॉम्ब धमकी मूल्यांकन समितीद्वारे परिस्थितीवर विचारमंथन केले जात आहे आणि कायद्याच्या अंमलबजावणीसह एमओसीएने बनावट कॉलर ओळखण्याचा आणि त्यांना “नो-फ्लाय लिस्ट” मध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

धमक्या वाढल्या...बुधवारीदेखील दोन फ्लाइट्स (आकासा एअर आणि इंडिगो) ना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या. पण, नंतर या धमक्या बनावट असल्याचे समजले. गेल्या तीन दिवसांतील ही 12वी घटना आहे. यापूर्वी, सोशल मीडियावर बॉम्बची बनावट धमकी मिळाल्यानंतर मुंबईहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान अहमदाबादला वळवण्यात आले होते. हे विमान मंगळवारी रात्री सुमारे 200 प्रवासी आणि कर्मचारी घेऊन मुंबईहून निघाले होते. 

3 दिवसांत 12 विमानांना धमकी मंगळवारी 7 फ्लाइट्सना बॉम्बच्या खोट्या धमक्या मिळाल्या होत्या. यामध्ये दिल्ली-शिकागो एअर इंडिया फ्लाइट, जयपूर-बंगळुरू एअर इंडिया एक्स्प्रेस, दम्मम-लखनऊ इंडिगो फ्लाइट, दरभंगा-मुंबई स्पाईसजेट फ्लाइट, सिलीगुडी-बंगळुरू आकासा एअर फ्लाइट, अलायन्स एअर अमृतसर-डेहराडून-दिल्ली फ्लाइट आणि एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइटचा समावेश आहे. यापूर्वी सोमवारी दोन इंडिगो फ्लाइट आणि एअर इंडियाच्या एका फ्लाइटलाही अशाच प्रकारच्या खोट्या धमक्या मिळाल्या होत्या. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) सायबर सुरक्षा एजन्सी आणि पोलिसांसोबत धमक्यांमागील गुन्हेगारांचा शोध घेत आहे.

टॅग्स :airplaneविमानCrime Newsगुन्हेगारीIndiaभारत