Hijab Banned In Minority Schools : कर्नाटकातील अल्पसंख्यक शांळांमध्येही हिजाबवर बंदी; बोम्मई सरकारनं जारी केला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 12:27 PM2022-02-18T12:27:27+5:302022-02-18T12:40:05+5:30
अल्पसंख्यक कल्याण विभाग, हज आणि वक्फ विभागाचे सचिव मेजर मणिवन्नन पी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आगहेत. विभागाने आपल्या आदेशात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचाही उल्लेख केला आहे. यात विद्यार्थ्यांना वर्गामध्ये भगवी शॉल, स्कार्फ आणि हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली आहे.
कर्नाटकातील अल्पसंख्याक शाळांमध्येही हिजाबवर बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या बोम्मई सरकारने गुरुवारी यासंदर्भात आदेश जारी केले. राज्यातील मौलाना आझाद मॉडेल इंग्रेजी माध्यमाच्या शाळांसह अल्पसंख्यक कल्याण विभागाद्वारे चालविल्या जाणाऱ्या शाळांत शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली आहे.
अल्पसंख्यक कल्याण विभाग, हज आणि वक्फ विभागाचे सचिव मेजर मणिवन्नन पी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आगहेत. विभागाने आपल्या आदेशात कर्नाटकउच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचाही उल्लेख केला आहे. यात विद्यार्थ्यांना वर्गामध्ये भगवी शॉल, स्कार्फ आणि हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली आहे.
आदेशात म्हणण्यात आले आहे की, "उच्च न्यायालयाचा वरील आदेश अल्पसंख्याक कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या निवासी शाळा, महाविद्यालये, मौलाना आझाद आदर्श इंग्रजी माध्यमांच्या शाळांवरही लागू आहे. मौलाना आझाद मॉडेल इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि अल्पसंख्यक कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये भगवी शॉल, स्कार्फ आणि हिजाब घालण्यास मनाई आहे."
अल्पसंख्यक मुलींसंदर्भात शाळा आणि महाविद्यालयांत वाढत्या तणावात हा आदेश आला आहे. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बुर्का आणि हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना शाळात आणि महाविद्यालयांत प्रवेश देण्यात आला नव्हता.