शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

अवकाशात हाडे ठिसूळ होतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 11:44 AM

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अन्य एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात ५ जून २०२४ रोजी झेपावल्या होत्या. विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे स्टारलाइनर अवकाशात गेले. आता त्यांना आयएसएस (इंटरनॅशनल स्पेस सेंटर) मधून परत येण्यात अडचण येत आहे. अंतराळयानात हेलियमची गळती होत असल्याने त्यांना तिथेच राहावे लागत आहे. गळती थांबवून त्यांना लवकर परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

लीना बोकील, अंतराळ आणि खगोलशास्त्र अभ्यासकआयएसएस हे पृथ्वीपासून ३५० ते ४०० कि.मी.वर अवकाशात फिरत राहते. स्पेस सेंटर म्हणजे फिरती प्रयोगशाळा आहे. अवकाशात हे सेंटर पृथ्वीभोवती फिरते. एका तासात ५८ हजार किलोमीटर अंतर ते सेंटर कापते.

दोघे ज्या यानात गेले, त्यातील थ्रस्टरमध्ये गळती होत आहे. या यानात २८ थ्रस्टर आहेत. थ्रस्टर म्हणजे इंजिनसारखे. त्या थ्रस्टरची दुरुस्ती होत आहे. एक तर तिथले तापमान विचित्र असते. खूपजण विचारतात की, समस्या येणार असल्याचे लक्षात आले नाही का, तिथे समस्या का आली, तर असे होते की, तिथल्या वातावरणात काय अडचणी येतील, ते इथे पृथ्वीवरून कळत नाही. सर्व थ्रस्टर तपासून पाठवलेले असतात. इथे जी समस्या आली नाही, ती तिथे आली. ‘नासा’मध्ये बसलेले इंजिनिअर हे त्याची दुरुस्ती करत आहेत. हे काम संगणकीय प्रणालीद्वारे होत असते. 

४ ऑगस्टला, म्हणजे आज सुनीता विलियम्सला अंतराळात दाेन महिने पूर्ण हाेतील.

अंतराळवीरांच्या सुरक्षेची काळजीस्पेस सेंटरमध्ये पूर्वीपासून काही अंतराळवीर आहेत, त्यांना हे दोघे मदत करत आहेत. ते काही दिवसांत परत येणार होते, पण ४० दिवस होऊनही अजून तिथेच आहेत. खरं तर या उशिराने त्यांना काही धोका नाही. इंधन संपले तरी त्यांना पुरवले जाते. स्पेस सेंटरला नेहमीच सर्व गोष्टी पुरविल्या जातात. त्यामुळे त्यांना खाण्यापिण्याची कमतरता नाही.

अंतराळवीर जेव्हा अवकाशात जातात, तेव्हा त्यांच्या सुरक्षेला खूप महत्त्व दिलेले असते. यापूर्वी कोलंबिया यान पडले होते. त्यात आपल्या कल्पना चावला मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यामुळे आता अंतराळवीरांची खूप काळजी घेतली जाते. 

गुरुत्वाकर्षण नसल्याचा शरीरावर हाेताे परिणाम- अवकाशात गुरुत्वाकर्षण नाही. त्यामुळे पायांचे स्नायू काम करत नाहीत. पृथ्वीवर आपल्या गुडघ्यांवर सर्व ताण येत असतो, पण तिथे काहीच होत नाही. तिथे ते तरंगत राहतात. त्यांच्या शरीराची हालचाल होत नसते. त्यामुळे त्यांची हाडे ठिसूळ होण्याचा धोका असतो; कारण ते कार्यरत नसतात. कॅल्शिअम कमी होत जाते. - चाळिशी किंवा पन्नाशीनंतर पण हे अंतराळवीर खूप फिट असतात; परंतु, तिथे जाऊन आल्यावर हाडांची समस्या जाणवू लागते. म्हणून त्यांना तिथे आहार आणि डाएट वेळच्या वेळी घ्यावा लागतो.  - अतिशय कमी पाणी ते पितात. इथे आपल्याला भूक लागते. तिथे खूप कमी खातात. त्यांचा नेहमीचा आहार कमीच असतो. तिथले वातावरण हे २४ तास एकच असते. - पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे शरीरातील रक्त पायाकडे प्रवाही होत असते, पण स्पेसमध्ये रक्तप्रवाह डोक्याकडे जात असतो. त्यामुळे डोळ्यांवर आणि मेंदूवर अधिक ताण येतो. जेव्हा हे अंतराळवीर परत येतात, तेव्हा त्यांना क्वारंटाइन केले जाते. त्यांना परत सर्व गोष्टी हळूहळू दिल्या जातात.

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अन्य एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात ५ जून २०२४ रोजी झेपावल्या होत्या. विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे  स्टारलाइनर अवकाशात गेले. आता त्यांना आयएसएस (इंटरनॅशनल स्पेस सेंटर) मधून परत येण्यात अडचण येत आहे. अंतराळयानात हेलियमची गळती होत असल्याने त्यांना तिथेच राहावे लागत आहे. गळती थांबवून त्यांना लवकर परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

२००३ साली १ फेब्रुवारी राेजी काेलंबिया या अंतराळ यानाचा अपघात हाेऊन त्यातील कल्पना चावलासह ७ अंतराळवीर मृत्यूमुखी पडले हाेते. 

पाण्याविना राेप वाढवण्याचे प्रयत्नशून्य गुरुत्वाकर्षणामध्ये सिंचन कसे होते? त्याचा प्रयोग केला जात आहे. अंतराळात पाण्याविना रोप वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.आपण जेव्हा चंद्रावर, मंगळ ग्रहावर जाऊन राहिलो, तर तिथे वृक्ष, पिके हवीत. म्हणून तसा प्रयोग स्पेस सेंटरमध्ये केला जात आहे. १८ दिवसांची मुदत- आता १८ दिवसांच्या आत त्यांनी परत यायचे आहे; कारण रशियाच्या यानातून त्यांचे दोन अंतराळवीर जाणार आहेत.- ते तिथे गेल्यावर गर्दी होईल. म्हणून रशियाचे दोघे गेल्यानंतर सुनीता विल्यम्स आणि त्यांचा सहकारी परत येणार आहे.  

टॅग्स :NASAनासा