शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

बोगस सिमकार्डप्रकरणी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By admin | Published: June 28, 2016 8:12 PM

युवकाचे दस्तावेज, छायाचित्र व बनावट स्वाक्षरीचा वापर करून सिमकार्ड खरेदी-विक्री करणा-या तिघांविरुद्ध मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल.

अकोला: हबीब नगरमधील खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी युवकाचे दस्तावेज, छायाचित्र व बनावट स्वाक्षरीचा वापर करून सिमकार्ड खरेदी-विक्री करणार्‍या तिघांविरुद्ध डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी सायंकाळी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये टेलीनॉर कंपनीचा वितरक, किरकोळ विक्रेता व अज्ञात सिमकार्डधारक यांचा समावेश असून दहशतवादविरोधी सेलचे प्रमुख नितीन पाटील यांच्या तपासणीनंतर हा गुन्हा उघड झाला.खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी जुनैद शाह बरकत शाह या युवकाच्या दस्तावेजाचा व छायाचित्रासह बनावट स्वाक्षरीचा वापर करून त्याच्या नावावर दुसर्‍या व्यक्तीने युनीनॉर कंपनीचे सिमकार्ड खरेदी केली. त्यानंतर सदर सिमकार्ड वापरात आणले. हा प्रकार युवकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने या प्रकरणाची तक्रार केली. या तक्रारीवरून दहशतवादविरोधी सेलचे प्रमुख नितीन पाटील यांच्या पथकाने सिमकार्ड खरेदी-विक्रीसह सर्व प्रक्रियेची तपासणी केली. यामध्ये अज्ञात सिमकार्डधारकाने बनावट दस्तावेजाद्वारे खैर मोहम्मद प्लॉट येथील सैय्यद निजाम याच्या मालकीच्या किरकोळ सिमकार्ड विक्रेता अयान मोबाइल नामक दुकान तसेच दोसानी सेल्स ॲण्ड सर्व्हिसेसचा मालक व वितरक आणि अज्ञात सिमकार्डधारक यांच्याविरुद्ध डाबकी रोड पोलीस स्टेशनमध्ये युवकाने तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सदर आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या मार्गदर्शनात असलेल्या दहशतवादविरोधी सेलचे प्रमुख रात्र-दिवस बोगस सिमकार्डची तपासणी करीत असून यामध्ये संशय आढळल्यानंतर बोगस सिमकार्डधारकांवर व विक्रेत्यांवर कारवाई करीत आहेत. या पथकाने आतापर्यंत २० च्यावर कारवाई केल्या आहेत.