नवी दिल्ली: देशभरात अडकलेल्या गरीब मजुरांना सोडण्यासाठी सध्या श्रमिक विशेष रेल्वे सुरू आहेत. यानंतर रेल्वेनं देशभरात मेल एक्स्प्रेस ट्रेन्स सुरु करणर असल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिली होती. १ जूनपासून दररोज २०० स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार असल्याचं पीयूष गोयल यांनी सांगितलं होतं. त्यानूसार आयआरसीटीसी (IRCTC)ने 1 जूनपासून सुरू होणाऱ्या २०० गाड्यांच्या ऑनलाईन बुकिंगला सुरुवात केलेली आहे.
२०० स्पेशल ट्रेनच्या तिकिटांची बुकिंग आयआरसीटीसी या वेबसाइटवरुन किंवा मोबाईल अॅपवरुन करता येणार आहे. तसेच प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व प्रवाशांच स्क्रीनिंग केलं जाणार असून कोरोनाची लक्षणं नसलेल्या व्यक्तींनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार, या २०० ट्रेन्सपैकी काही ट्रेन्स मुंबईहून सुटणाऱ्या किंवा मुंबईत येणाऱ्या आहेत. याशिवाय एक गाडी पुण्यातून सुटणार आहे.
मुंबईहून सुटणाऱ्या ट्रेन्स कोणत्या?
मुंबई - भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेसLTT - दरभंगा एक्स्प्रेसLTT - वाराणसी कामायनी एक्स्प्रेसLTT - पाटलीपुत्र एक्स्प्रेसLTT - गुवाहाटी एक्स्प्रेसLTT - तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेसमुंबई CST - वाराणसी महानगरी एक्स्प्रेसमुंबई CST - गदग एक्स्प्रेसमुंबई CST - बंगळुरू उद्यान एक्स्प्रेसमुंबई CST - हैदराबाद हुसैनसागर एक्स्प्रेसवांद्रे टर्मिनस - जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसमुंबई सेंट्रल - अहमदाबाद कर्णावती एक्स्प्रेसमुंबई सेंट्रल - जयपूर एक्स्प्रेसवांद्रे टर्मिनस - गोरखपूर अवध एक्स्प्रेसवांद्रे टर्मिनस - मुझ्झफरपूर अवध एक्स्प्रेस
मुंबईला येणाऱ्या गाड्या
लखनऊ - मुंबई CST - पुष्पक एक्स्प्रेसहावडा - मुंबई CST मेलअमृतसर - मुंबई सेंट्रल गोल्डन टेंपल मेलअमृतसर - वांद्रे टर्मिनस पश्चिम एक्स्प्रेसपटना - LTT एक्स्प्रेसगोरखपूर - LTT एक्स्प्रेस
पुण्याहून सुटणारी गाडी
पुणे - दाणापूर एक्स्प्रेस
या गाड्यांमध्ये एसी आणि नॉन एसी असे दोन क्लास तसेच जनरल कोचही असतील. सर्वच कोचसाठी आरक्षण करावं लागणार आहे.