नवी दिल्ली : ईशान्येकडील राज्यांतील सीमा वाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारने उपग्रहाची मदत घेण्याचे ठरवले आहे. हा सीमावाद बऱ्याच वेळा काळजीचा व कधी तर हिंसकही वळण घेणारा ठरला आहे. ईशान्येकडील राज्यांच्या सीमा निश्चित करण्याचे काम नॉर्थ इस्टर्न स्पेस ॲप्लिकेशन सेंटरला (एनईएसएसी) देण्यात आल्याचे दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले. आसाम-मिझोरम राज्यात २६ जुलै रोजी सीमावाद हिंसक बनला व आसामचे पाच पोलीस व नागरिक गोळीबारात मरण पावले. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दोन राज्यांतील सीमा निश्चित करण्यासाठी उपग्रहाचा वापर करण्याची सूचना केली होती. शहा यांनी ईशान्येकडील आंतरराज्य सीमांचा आणि जंगलाचा नकाशा काढण्यासाठी एनईएसएसीचा उपयोग करण्याची शिफारस केली होती.
ईशान्य राज्यांच्या सीमा उपग्रहच ठरविणार, वाद मिटविण्यासाठी नवा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 8:57 AM