गेल्या वर्षी मे महिन्यापासूच भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. यानंतर हा वाद सोडवण्यासाठी देशातील सैन्य आणि राजकीय स्तरावरही अनेक चर्चा पार पडल्या आहेत परंतु आता पँगाँग लेकच्या दक्षिण आणि उत्तर भागातून भारत आणि चीन आपलं सैन्य मागे परतत असल्याचा दावा चिनी प्रपोगंडा पसवणारं वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं केला आहे. दरम्यान, चीनच्या या दाव्यावर भारतानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही."भारत आणी चीनच्या कमांडर स्तरावर झालेल्या नवव्या टप्प्यातील चर्चेत दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या सहमतीनुसार चीन आणि भारत बॉर्डर ट्रुप्सनं बुधावारी पँगाँग लेकच्या उत्तर आणि दक्षिण भागातून मागे हटण्यास सुरूवात केली आहे," असा दावा ग्लोबल टाईम्सनं चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या हवाल्यानं केला आहे.
Border standoff: पँगाँग लेक परिसरातून भारत-चीनचे सैनिक मागे हटण्यास सुरूवात; चिनी माध्यमाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 19:32 IST
Border standoff : यापूर्वी दोन्ही देशांची नवव्या टप्प्यातील फेरी सकारात्मक झाल्याची देण्यात आली होती माहिती. सैनिक मागे हटण्यावर भारताकडून प्रतिक्रिया नाही.
Border standoff: पँगाँग लेक परिसरातून भारत-चीनचे सैनिक मागे हटण्यास सुरूवात; चिनी माध्यमाचा दावा
ठळक मुद्देगेल्या वर्षी दोन्ही देशांमध्ये वाढला होता तणावभारत चीनदरम्यान नवव्या टप्प्यातील चर्चा झाली होती सकारात्मक