शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

सीमेवरील तणावातही भारतात चीनमधूनच सर्वाधिक आयात; अमेरिकेकडून होणारी आयात दुसऱ्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 7:07 AM

या वर्षात इतर देशांच्या तुलनेत चीनमधून सर्वाधिक आयात झाली आहे. चीननंतर अमेरिका, युएई, सौदी अरेबिया आणि इराक या देशांचा क्रमांक लागतो. हे भारतात होणाऱ्या आयातीचे प्रमुख पाच देश आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या अमेरिकेतून २६.८९ अब्ज डॉलरची आयात २०२०मध्ये झाली.  

हरिश गुप्ता - नवी दिल्ली : गेल्या वर्षी पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबारेषेवर भारत आणि चीन यांच्या सैन्यात तीव्र स्वरूपाचा संघर्ष सुरू असतानाही जानेवारी ते डिसेंबर २०२० या काळात भारतातचीनमधूनच सर्वाधिक आयात झाल्याची माहिती सरकारने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार माला रॉय यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लोकसभेत सांगितले की, २०२०मध्ये भारताने चीनमधून ५८.७१ अब्ज डॉलरचा माल आयात केला. (In border tensions, India has the highest imports from China; Second place comes from US imports)

या वर्षात इतर देशांच्या तुलनेत चीनमधून सर्वाधिक आयात झाली आहे. चीननंतर अमेरिका, युएई, सौदी अरेबिया आणि इराक या देशांचा क्रमांक लागतो. हे भारतात होणाऱ्या आयातीचे प्रमुख पाच देश आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या अमेरिकेतून २६.८९ अब्ज डॉलरची आयात २०२०मध्ये झाली.  

९२ कंपन्यांचे प्रकल्पकंपनी व्यवहार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ९२ चिनी कंपन्यांनी भारतात प्रकल्प उभारले आहेत. त्यातील ८० कंपन्या सक्रिय आहेत. रिझर्व्ह बँकेच्या तपशिलानुसार, चीनमधून २,४७४ एफडीआय प्रस्ताव आले आहेत.

-  युएईतून २३.९६ अब्ज डॉलर, सौदी अरेबियातून १७.७३ अब्ज डॉलर आणि इराकमधून १६.२६ अब्ज डॉलरची आयात झाली. या सर्वोच्च पाच देशांतून एकूण १४३.५५ अब्ज डॉलरची आयात भारताने केली. एकूण आयातीच्या तुलनेत या पाच देशांतून झालेली आयात ३८.५९ टक्के आहे. २०२० मधील भारताची एकूण आयात ३७१.९८ अब्ज डॉलर आहे. 

- पुरी यांनी सांगितले की, उत्पादन आणि पुरवठा तसेच ग्राहकांची मागणी व प्राधान्ये यातील तफावत भरून काढण्यासाठी वस्तूंची आयात केली जाते. चीनमधून प्रामुख्याने दूरसंचार उपकरणे, संगणक हार्डवेअर व अनुषांगिक उत्पादने, वीज उत्पादने आदी वस्तू आयात केल्या.  

टॅग्स :chinaचीनIndiaभारतladakhलडाखBorderसीमारेषाborder disputeसीमा वाद