शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

धक्कादायक! उधारीचे १५०० रुपये दिले नाहीत, तरुणाला स्कुटरला बांधून पळवले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 12:45 PM

एखाद्याने पैसे वेळेत परत केले नाहीत म्हणून मारहाणीच्या घटना आपण अनेक ठिकाणी पाहिल्या आहेत. काही ठिकाणी सावकारकीच्या घटनाही समोर येतात.

एखाद्याने पैसे वेळेत परत केले नाहीत म्हणून मारहाणीच्या घटना आपण अनेक ठिकाणी पाहिल्या आहेत. काही ठिकाणी सावकारकीच्या घटना समोर येतात. सावकारांनी पैशांसाठी केलेल्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक घटना ओडिशातून समोर आली आहे. उधारीचे पैसे दिले नाहीत म्हणून एका तरुणाला  स्कुटरला रस्सीने बांधून २ किलोमीटर पळवल्याची धक्कादाक घटना समोर आली आहे. 

या घटनेचा फोटो समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधीत तरुणांना ताब्यात घेतले आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू केली आहे. ही घटने ओडिशा येथील कटक येथील आहे. या संदर्भात पोलीस अधिकारी डीसीपी पिनाक मिश्रा यांनी माहिती दिली. 

"सोमवारी रात्री ११ वाजता ही घटना घडली. मंगळवारी पीडित तरुणासोबत आरोपीचीही ओळख पटली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. जगन्नाथ बेहरा असे पीडित तरुणाचे नाव आहे. जगन्नाथने आरोपींकडून १५०० रुपये उसने घेतले होते. ते पैसे त्याने वेळेत परत केले नाहीत म्हणून त्या आरोपींनी त्याचे दोन्ही हात स्कूटरला दोरीने बांधले आणि कटकच्या गर्दीचा असणाऱ्या रस्त्यावर त्याला २ किलोमीटरहून अधिक पळायला लावले. 

 

आता हेल्मेट नाही तर दारू नाही! अपघात रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचा नवा उपाय

रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तरुणासोबत ही धक्कादायक घटना घडली. या नंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओवरुन पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. पीडित तरुण जगन्नाथची आरोपी व्यक्तीशी आधीच ओळख होती. त्याने आरोपींकडून १५०० रुपये उसने घेतले होते, मात्र ते पैसे परत करू शकले नाहीत. या रागात गुंडांनी अमानुष कृत्य केले. गुंडांनी आधी त्यांचे हात बांधले आणि नंतर दोरीने स्कूटरला बांधले. आणि रस्त्यावरुन पळवले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSocial Viralसोशल व्हायरलPoliceपोलिस