मुख्य आरोपीसह दोघांना अटक
By admin | Published: March 14, 2016 12:20 AM
जळगाव: किशोर चौधरी याच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी सुरेश दत्तात्रय सोनवणे व त्याचा सहकारी उमेश धनराज कांडेलकर या दोघांना रविवारी सकाळी शनी पेठ पोलिसांनी अटक केली. या गुन्ात अटकेत असलेल्यांची संख्या आता अकरावर पोहचली आहे. पंकज वासुदेव पाटील व किशोर अनिल कोळी यांचा शोध सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी सांगितले.
जळगाव: किशोर चौधरी याच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी सुरेश दत्तात्रय सोनवणे व त्याचा सहकारी उमेश धनराज कांडेलकर या दोघांना रविवारी सकाळी शनी पेठ पोलिसांनी अटक केली. या गुन्ात अटकेत असलेल्यांची संख्या आता अकरावर पोहचली आहे. पंकज वासुदेव पाटील व किशोर अनिल कोळी यांचा शोध सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी सांगितले.फरार आरोपींच्या शोधासाठी शेगाव, चोपडा व इगतपुरी येथे पोलिसांचे पथकआणखी दुसरे पथक पाठविण्यात आले होते. सुरेश सोनवणे हा इगतपुरी येथे तर उमेश हा त्याच्या गावातील जंगलात होता. पोलीस मागावर असल्याने त्यांचे सर्व पर्याय संपुष्टात आले होते. इगतपुरीला पोलीस पोहचण्याच्या आधी सुरेश जळगावात दाखल झाला होता. शनी पेठतून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले तर कालिंका माता मंदीर चौकातून उमेशला ताब्यात घेण्यात आले.गुन्ातील दुचाकी जप्तघटनेच्या दिवशी सुरेश सोनवणे हा घटनास्थळावर दुचाकीने (स्कुटी) आला होता. नंतर परत जावून पुन्हा एका जणाला त्याने दुचाकीवर आणले होते, हा सारा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. त्यानुसार सोनवणेने गुन्ात दुचाकीचा वापर केल्याचे सिध्द झाल्याने ती दुचाकीही पोलिसांनी रविवारी जप्त केली. दरम्यान, तणावाच्यापार्श्वभूमीवर शनी पेठ व चौघुले प्लॉट भागात आरसीपी बंदोबस्त रविवारीही कायम होता.