शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
2
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
3
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
4
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
6
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
7
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
8
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
9
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
10
“राहुल गांधीची भूमिका संविधान बचाओ, फडणवीसांना शहरी नक्षलवाद का वाटतो?”; काँग्रेसचा सवाल
11
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
12
'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे
13
"काहीही झालं तरी जातनिहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणारच"
14
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
15
'तो' एक फॉर्म्युला लागू झाल्यास परळीत धनंजय मुंडेंची होणार अडचण; नेमकं राजकारण काय?
16
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
17
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
18
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
19
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
20
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी

'त्या' दोघींनी किडनी देऊन वाचविले आपल्या भावाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2017 1:04 PM

बहिणीने भावाचे किडनी देऊन प्राण वाचविले आहेत.

ठळक मुद्दे बहिणीने भावाचे किडनी देऊन प्राण वाचविले आहेत. जयपूर आणि उत्तरप्रदेशातील या दोन महिलांनी भावाला किडनी देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत. . जयपूरमधील संगानेरमध्ये राहणाऱ्या 43 वर्षीय सावित्री देवी यांनी त्यांचा भाऊ बलराम सैनी यांना किडनी दिली. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील वंदना चंद्रा यांनीही त्यांचा भाऊ विवेक साराभॉय यांना किडनी देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत

मुंबई, दि. 7- भावा बहिणीची नात प्रत्येक नात्यापेक्षा वेगळं असतं. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचं नेहमी रक्षण करण्याची जबाबदारी घेतो. राखी बांधल्यावर भाऊ आपल्या बहिणीला खास भेटवस्तूही देतो.  भावाकडून रक्षाबंधनाच्या दिवशी भेटवस्तू मिळविण्याची परंपराचं आहे. पण अशीही उदाहरण आहेत जिथे बहिणीने भावाचे किडनी देऊन प्राण वाचविले आहेत. जयपूर आणि उत्तरप्रदेशातील या दोन महिलांनी भावाला किडनी देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत. जयपूरमधील संगानेरमध्ये राहणाऱ्या 43 वर्षीय सावित्री देवी यांनी त्यांचा भाऊ बलराम सैनी यांना किडनी दिली. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील वंदना चंद्रा यांनीही त्यांचा भाऊ विवेक साराभॉय यांना किडनी देऊन त्यांचे प्राण वाचविले आहेत.

जयपूरमध्ये राहणाऱ्या सावित्री देवी यांचा भाऊ बलराम सैनी यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपण करायला सांगितलं होतं. बलराम त्यांना किडनी देणाऱ्या व्यक्तीच्या शोधात होते. घरातील व्यक्तीची बलराम यांना किडनी मिळावी, याचा शोध ते घेत होते. मला तीन बहिणी आहेत आणि माझा किडनीचा मुद्दा समोर आल्यावर त्या तिघीही मला किडनी देण्यासाठी पुढे सरसावल्या. पण त्या तिघींपैकी दोघी जणी वैद्यकियदृष्ट्या फिट नव्हत्या. म्हणून माझी मोठी बहिण सावित्री हिने मला किडनी द्यायचं ठरवलं, असं सैनी म्हणाले आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी खरंतर बहिणीचं रक्षण करण्याची जबाबदारी भाऊ घेतो पण इथे माझ्या बहिणीने माझं आयुष्य वाचविल्याची भावना सैनी यांनी व्यक्त केली आहे. मी तिला कितीही मोठी भेट दिली तरी तिच्या या भेटीपेक्षा ती कधीच मोठी नसेल, असंही ते म्हणाले.  

रक्षाबंधनाचं असंच एक उदाहरण उत्तर प्रदेशातही बघायला मिळालं. उत्तर प्रदेशात बहिणीनेच भावाला किडनीची भेट देऊन त्याचे प्राण वाचविल्याची अनोखी घटना घडली आहे. विशेष म्हणजे तो आजच रक्षाबंधनाच्या दिवशी हॉस्पिटलमधून घरी येणार आहे. वंदना चंद्रा असं या महिलेचं नाव आहे. तिचा भाऊ विवेक साराभॉय हे आग्रा जिल्हा न्यायालयात वरिष्ठ वकील आहेत. आजारपणामुळे विवेक यांच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या होत्या. त्यांना किडन्या मिळाव्यात म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी एम्स, लखनऊचे पीजीआय हॉस्पिटल, वेदांता हॉस्पिटल आणि अपोलो हॉस्पिटलसहीत अनेक हॉस्पिटल्स पाहिली. पण त्यांना किडनी दान करणारं कुणी मिळालं नाही. विवेक यांची प्रकृती खालावत असताना वंदना यांनी त्यांना किडनी देण्याचा निर्णय घेतला. वंदना यांचं लग्न झालेलं असून त्यांना १२ वर्षाची एक मुलगी आहे. माझं भावावर प्रेम आहे. संकटाच्या काळात तो नेहमीच माझ्यापाठी खंबीरपणे उभा राहिला. अशा नाजूक प्रसंगी त्याचा जीव वाचविणं हेच महत्त्वाचं होतं. त्याला किडनी दिली आणि त्याचा जीव वाचला. त्यामुळे यंदाचा रक्षाबंधन माझ्यासाठी विशेष आहे, असं वंदना म्हणाल्या.