संतोष ठाकूरनवी दिल्ली : रेल्वेने प्रवाशांना आता रिकाम्या बॉटल्स परत कराव्या लागतील. स्टेशनसह रेल्वेगाड्यांमध्ये आयआरसीटीसी (इंडियन रेल्वे केटरिंग टुरिझम कॉर्पोरेशन) तसेच इतर करारबद्द एजन्सीच्या कर्मचाऱ्यांंवर बॉटल जमा करण्याची जबाबदारी राहील. बॉटल एकत्रित करण्यासाठी एक बॉक्सही ठेवण्यात येणार आहे. देशातील सर्व अ-१ आणि अ-२ श्रेणीतील ४०७ रेल्वे स्टेशनवर पथदर्शी प्रयोगाच्या आधारे बॉटल नष्ट करणारी मशिन लावण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
इतर मोठ्या स्टेशनवर देखील ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. एकाचवेळी वापरात येणारे प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात आले होते. मोदींच्या आवाहनानंतर हे काम हाती घेण्यात आले आहे. गांधी जयंतीनिमित्त २ आॅक्टोबरपासून हे काम सुरू केले जाईल.
रेल नीर प्रकल्पाचे भविष्य धोक्यात!या निर्णयामुळे आयआरसीटीसीकडून उभारण्यात येणाºया रेल नीरच्या प्लान्टचे भविष्य धोक्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सद्यस्थितीत दररोज ६ लाख लिटर पाण्याच्या बाटल्या तयार केल्या जातात. हे प्रमाण १६ लाख लिटरच्या घरात नेण्याचे उद्दिष्ट आयआरसीटीसीचे आहे.
पाणी व्यवसायात १० टक्के वाढरेल्वेतील पिण्याच्या पाण्याची गरज आरआरसीटीसी भागवू शकत नाही. दुसºया ब्रॅन्डच्या पाण्याची त्यामुळे मागणी वाढली आहे. सध्या रेल्वे स्टेशन आणि रेल्वेत पाणी विक्रीचा व्यवसाय वर्षाकाठी ६०० कोटींच्या घरात पोहचला आहे. व्यवसायात वर्षाकाठी १० टक्क्यांनी वाढ होत आहे.
एकदा वापरात येणाºया प्लॅस्टिकच्या बॉटलवर बंदी आली, तर नव्या प्लान्टचे काय होईल? यासंबंधी आयआरसीटीसी संभ्रमात आहे.आयआरसीटीसीवर वाढेल आर्थिक ओझे सर्व बॉटल गोळा करण्यासाठी रेल्वे तसेच स्टेशनवर कर्मचाºयांची नियुक्ती करावी लागेल. आयआरसीटीसीवर त्यामुळे आर्थिक ओझे वाढेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. विद्यमान करारांमधील नियमांमध्येही बदल करावा लागेल. करारबद्द एजन्सीला हे काम करण्याचे बंधन घालण्यात येईल. अगोदर करण्यात आलेल्या करारांमध्ये हा नियम कशाप्रकारे लागू करता येईल, या पर्यायांचा शोध आता आयआरसीटीसीकडून घेण्यात येत आहे.