नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील पब्जच्या संरक्षणाचे काम करणाऱ्यांना (अर्थातच बाउन्सर्स) घडविण्याचे काम दिल्लीच्या दक्षिणेकडे असलेल्या असोला-फतेहपुरी बेरी या खेड्यांत चालते. पब्जच्या संरक्षणासाठी बाउन्सर्स तयार करणारे खेडे अशी त्याची ओळखही झाले आहे. रोज सकाळी व सायंकाळी दोन-दोन तासांचे काम शरीर कमावण्यासाठी केले जाते. हे मल्ल रोज शेकडो दंडबैठका व पुशअप्स करतात, खांद्यावर विटांचे वजन पेलतात व आपल्या खांद्यावरून दुसऱ्याला वाहून नेतात. ते दारू पीत नाहीत की सिगारेट. त्यांचा आहार प्रामुख्याने काजू, फळे, दही व भरपूर दूध असा आहे. या आखाड्यातील एकही जण व्यायामशाळेत मात्र जात नाही.
या खेड्यांत तयार होतात बाउन्सर्स
By admin | Published: January 05, 2017 2:49 AM