Nipah Virus :केरळमधील मलप्पुरममध्ये रविवारी निपाह व्हायरची लागण झालेल्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलावर कोझिकोड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, याबाबत केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे. वीणा जॉर्ज म्हणाले की, मृताचे सहा मित्र आणि एका ६८ वर्षीय पुरुषाची निपाह संसर्गाची चाचणी करण्यात आली होती, पण त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून; दुकानांवरील नावे, नीटचे मुद्दे ऐरणीवर
'मृत व्यक्तीचे सहा मित्र त्याच्याशी थेट संपर्कात होते, पण ६८ वर्षीय व्यक्ती नाही, वृद्ध व्यक्तीची संसर्गाची चाचणी घेण्यात आली कारण त्यांना ताप आला होता, ३३० जण त्या मुलाच्या थेट संपर्कात आले होते, त्यापैकी ६८ आरोग्य कर्मचारी आहेत, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.
७ जणांना उपचारासाठी दाखल केले
मंत्री वीणा जॉर्ज म्हणाले, मुलाच्या थेट संपर्कात आलेल्या लोकांपैकी १०१ जण हाय रिस्कमधील आहेत, त्यापैकी सात जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मृत मुलाच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यामध्ये निपाह संसर्गाची लक्षणे आढळून आली नाहीत.
आरोग्य विभागाने रविवारी दोन पंचायतींमधील ३०७ घरांचे सर्वेक्षण केले, यामध्ये साथीचे केंद्र असलेल्या पंडिक्कडसह १८ जण तापाचे रुग्ण आढळले, तर अनक्कयम पंचायतीमधील ३१० घरांच्या सर्वेक्षणात तापाचे १० रुग्ण आढळले. यापैकी कोणही मुलाच्या थेट संपर्कात नव्हते.
सोमवारी जिल्ह्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या जागांचे वाटप करताना प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत.
मंत्री जॉर्ज यांनी सांगितले की, हा मुलगा पंडिक्कड येथील असून रविवारी सकाळी १०.५० वाजता त्याला हृदयविकाराचा झटका आला, मात्र तो वाचू शकला नाही. “तो बेशुद्ध होता आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला वाचवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले, परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आणि त्याचे अंत्यसंस्कार आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार करण्यात येणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
मंत्री जॉर्ज म्हणाले, "जिल्हा दंडाधिकारी मुलाच्या पालकांशी आणि कुटुंबाशी चर्चा करतील आणि त्यानंतरच अंतिम संस्कारांबाबत निर्णय घेतला जाईल." मुलगा ११ मे रोजी शाळेत गेला होता, पण शाळेतील दुसऱ्या विद्यार्थ्यांना अद्याप लक्षणे दिसत नाहीत रुग्णांची प्रकरणे नोंदवली आहेत.