अनेकदा लहान मुलं खेळताना नाणी किंवा इतर वस्तू गिळतात. अशी अनेक प्रकरणे रोज पाहायला व ऐकायला मिळतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका 4 वर्षीय मुलाच्या पोटात चक्क मॅग्नेटिक ब्रेसलेट सापडलं. एक्स-रे पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत. सायन्स डायरेक्टच्या वृत्तानुसार, चार वर्षांच्या मुलाला दोन दिवसांपासून पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार होती, त्यानंतर पालकांनी मुलाला रुग्णालयात नेले.
मुलाचा एक्स-रे काढला तेव्हा सगळेच चक्रावून गेले. मुलाने नकळत मॅग्नेटिक ब्रेसलेट गिळल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवस सर्व काही सामान्य होते, पण नंतर मुलाला पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. पालकांना या प्रकरणाची माहिती नव्हती. त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचताच एक्स-रे पाहून त्यांना मोठा धक्काच बसला.
तपासाअंती डॉक्टरांना प्रथम मुलाला अॅपेन्डिसाइटिस झाल्याचे निष्पन्न झाले आणि त्यानंतर पालकांच्या संमतीनंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले, त्यानंतर तीन दिवसांनी त्याला उलट्या होऊ लागल्या. याच दरम्यान मुलाच्या पोटात असह्य वेदना होत होत्या. एपेन्डेक्टॉमीनंतरही पोटदुखी कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन दिवसांनंतर, लक्षणे पूर्वीसारखीच होती, त्यामुळे काय चूक आहे हे शोधण्यासाठी डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा असे दिसून आले की मुलाच्या पोटात मॅग्नेटिक ब्रेसलेट आहे, ज्यामुळे मुलाला त्रास होत आहे. याच दरम्यान, डॉक्टरांनी इमर्जन्सी लॅपरोटॉमी आणि त्यानंतर उपचार करून 18 चुंबकीय मण्यांनी बनवलेले ब्रेसलेट बाहेर काढलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"