जगातील सर्वात मोठे पायदळ असलेल्या भारतीय सैन्याच्या ताफ्यात एक खतरनाक हत्यार आले आहे. भारताच्या तिन्ही सैन्यदलांकडे अशी मिसाईल आहेत, जी डागल्यास शत्रूला सावध होण्याचा वेळच मिळणार नाही. जेवढ्या वेळात त्यांची डिफेन्स सिस्टिम हा हल्ला रोखण्यासाठी कार्यरत होऊ शकते, तेवढ्या वेळात हे मिसाईल आपले लक्ष्य उद्ध्व्स्त करू शकते. नाव आहे ब्रम्होस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल.
हे मिसाईल जगातील सर्वात वेगवान मिसाईल ठरले आहेत. कारण ब्रम्होस 4300 किमी प्रति तासाच्या प्रचंड वेगाने वार करण्याची क्षमता ठेवते. या आठवड्यात ब्रम्होसच्या अनेक चाचण्या घेण्यात येणार आहेत. आजच अंदमान, निकोबार बेटांवर या मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या मिसाईलने एका बेटावरून दुसऱ्या बेटावरील लक्ष्याचा भेद केला आहे.
हे मिसाईल रशिया आणि भारताच्या संरक्षण संस्थांनी विकसित केले आहे. BrahMos म्हणजे Brah चा अर्थ 'ब्रह्मपुत्रा' आणि Mos चा अर्थ 'मोस्कवा'. भारत आणि रशियाच्या दोन मोठ्या नद्यांचे नाव या मिसाईलला ठेवण्यात आले आहे. खरेतर ब्रम्होस मिसाईलचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता जी चाचणी सुरु आहे ती 290 किमी रेंजच्या मिसाईलची सुरु आहे. ही एक नॉन न्युक्लिअर मिसाईल आहे. हे मिसाईल आवाजाच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने झेपावते. हे मिसाईल सुखोई विमानातूनही डागण्यात येते.
दुसरे मिसाईल हे 450 किमी लांब लक्ष्यभेद करू शकते. याशिवाय आणखी एक व्हर्जनचे टेस्टिंग सुरु आहे. हे मिसाईल 800 किमीची मारकक्षमता ठेवते. ब्रम्होस मिसाईलची महत्वाची बाब म्हणजे हे मिसाईल पाणी, हवा आणि जमीनीवरूनही मारा करू शकते. या मिसाईलची पहिली चाचणी 2013 मध्ये झाली होती. हे मिसाईल पाण्याच्या 40 ते 50 मीटर आतूनही डागले जाऊ शकते.
पाणबुड्यांसाठीही तयार करणारभारताच्या ताफ्यात एकापेक्षा एक पाणबुड्या आहेत. तसेच या ब्रम्होससाठी अशा पाणबुड्या बनविल्या जात आहेत, ज्यांच्या टॉर्पिडोमध्येही ब्रम्होस मिसाईलचे छोटे व्हर्जन बसविता येणार आहे. ही मिसाईल जमिनीपासून 5 मीटरचे अंतर ठेवूनही झेपावू शकते. तर अधिकतर 14000 फुटांवरूनही हे मिसाईल लक्ष्यापर्यंत पोहोचू शकते.