कोयम्बतूर : रस्ते अपघातात ‘ब्रेन डेड’ झालेल्या ४७ वर्षांच्या व्यक्तीच्या अवयवदानाने सहा रुग्णांना नवे आयुष्य दिले. या व्यक्तीचे दोन डोळे, दोन मूत्रपिंडे, यकृत व त्वचेचे गरजू रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आले.जी.आर. विजयकुमार हे एका मिलमध्ये व्यवस्थापक होते. मोटारसायकलवरून जात असताना अन्नूर येथे अन्य दुचाकीने त्यांना धडक दिली. गंभीर अवस्थेत त्यांना येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचाराला कुठलाही प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना ‘ब्रेन डेड’ घोषित केले. यादरम्यान विजयकुमार यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दान करण्याची तयारी दर्शवली आणि त्याचे दोन डोळे, दोन मूत्रपिंडे, यकृत आणि त्वचा अशा सहा अवयवांचे दान करण्यात आले.मेंदू बंद पडून झालेल्या मृत्यूमध्ये माणसाचा फक्त मेंदू मृत (ब्रेन डेड) पावलेला असतो; परंतु इतर सर्व अवयव चालू असतात. उदाहरणार्थ मेंदू मृत पावलेला असला तरीही हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस हे सर्व अवयव चालू स्थितीत असतात; आणि हे अवयव आपण दानकरू शकतो. आपण फक्त आपल्या जवळच्या नातेवाइकाकरिता मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड, फुप्फुस आणि छोटी आतडी जिवंतपणी दान करू शकतो.
‘ब्रेन डेड’ व्यक्तीने सहा रुग्णांना दिले आयुष्याचे ‘गिफ्ट’
By admin | Published: January 01, 2016 2:08 AM